आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणे समर्थक आक्रमक:शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या घरावर हल्ला, अज्ञातांनी घरावर काचेच्या बाटल्या फेकल्या; राणे समर्थकांनी हल्ला केल्याची चर्चा

सिंधुदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुडाळमधील शिवसेना शाखेसमोर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरेंविषयी अपशब्द उच्चारल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप असल्याचे पाहायला मिळाले. या संतापाचे पडसात संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. त्यानंतर नारायण राणेंना अटक करण्यात आली. रात्री उशिरा राणेंना महाड न्यायलयाकडून जामीन मंजूर झाला आणि राणे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. दरम्यान रात्री शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या घरावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला आहे. कुडाळमधील शिवसेना शाखेसमोर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले. दरम्यान सिंधुदुर्गमधील तळगावात विनायक राऊतांच्या घरावर काचेच्या बाटल्या देखील फेकण्यात आल्या आहेत. रस्त्यावरून या बाटल्या रात्रीच्या अंधारात फेकल्याने या बाटल्या कोणी फेकल्या याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी या बाटल्या फेकल्या असल्याचे बोलले जात आहे. विनायक राऊत यांच्या घरावर पोलिसांचा बंदोबस्त असुन देखील त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त विनायक राऊत यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...