आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कणकवली:शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या मुलाची पोलिसांशी हुज्जत, निलेश राणेंनी समोर आणला व्हिडिओ

कणकवली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जवळपास 18 तास झाले तरीपण शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलावर 353 व 185 ची केस दाखल झाली नाही, हेच ठाकरे सरकार - निलेश राणे

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याने कणकवलीमध्ये पोलिसांना शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  माजी खासदार निलेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला. निलेश राणे यांनी गीतेश राऊतांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

 'शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलिसवाला ड्यूटी करतोय आणि खासदाराचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतोय. दारू पिऊन गाडी वेडी वाकडी चालवली तर पोलिस पकडणारचं. ही Section 353 आणि 185 अंतर्गत केस बनते.' असे ट्विट निलेश राणेंनी केली आहे.    यासोबत निलेश राणे यांनी यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर 22 सेकंदाचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. कणकवलीमध्ये एका चौकमध्ये गीतेश राऊत यांची गाडी पोलिसांनी अडवली असल्याचे दिसतेय. यावेळी गीतेश राऊत आणि एका पोलिसात गाडी वळवण्यावरून वाद झाला. यावरुन खासदरांचा मुलगा पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचे दिसतेय. 

मुलगा गीतेश राऊत यामध्ये म्हणतोय की, 'मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे, याने मला शिवी दिली, याला मी सोडणार नाही आता' तर तेथील पोलिस हा  गीतेश राऊत यांनीच पहिले शिवी दिल्याचं म्हणत आहे. तसंच,  माझी नोकरी घालवणार तू कोण? असा सवालही पोलिस करताना दिसत आहे. खासदाराच्या मुलावर कारवाई करावी अशी मागणीही निलेश राणेंनी हा व्हिडिओ शेअर करत केली आहे. 

यानंतर निलेश राणेंनी पुन्हा एक ट्विट केले आहे. 'जवळपास 18 तास झाले तरीपण शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलावर 353 व 185 ची केस दाखल झालेली नाही. जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळात पोलिस प्रमाणिक ड्युटी करतायेत पण त्यांच्या अंगावर दारू पिऊन खासदाराचा मुलगा भररस्त्यात धमकी देतो तरीही त्याला अटक होत नाही... हे ठाकरे सरकार.'