आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Shiv Sena On Political Tourism| Maharashtra Flood| Shiv Sena Targets BJP And Opposition On Flood Situation Visits And Politics Latest News And Updates

राजकीय पर्यटन थांबवा:राज्यात सरकार, मुख्यमंत्री असतानाही 'आमचा बाप दिल्लीचा' म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रासाठी हजार कोटींचा चेक घेऊन यावा; शिवसेनेचे घणाघात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील पूर आणि असमानी संकटात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या दौरे आणि आश्वासनांची शिवसेने खरडपट्टी काढली आहे. राज्यात सरकार आहे, मुख्यमंत्री सुद्धा असून हे सगळेच लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत. तरीही या संकट प्रसंगात विरोधकांकडून राजकीय पर्यटन सुरू आहे. तरीही विरोधकांनी 'आमचा बाप दिल्लीचा' अशी भूमिका घेणे कितपत योग्य आहे असा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केला आहे.

महाराष्ट्रासाठी हजार कोटींचा चेक घेऊन या
शिवसेने आपल्या मुखपत्रातून लिहिल्याप्रमाणे, तळिये-चिपळून, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी आणि नांदेडपर्यंत जलप्रलयाने नुकसान केले. प्रत्येक घरात मदत पोहोचवण्यासाठी ठाकरे सरकारला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. तरीही कुणी या संकटात राजकीय पर्यटन करून राग-लोभाची चिखलफेक करत असतील तर त्यांचा प्रश्न. दौरे करताना आपण केवळ पाहायला आलो नाही तर सर्वतोपरी मदतही देणार असे विरोधी पक्षाने म्हणणे कितपत योग्य आहे. विरोधकांचा आपल्या राज्यातील सरकारवरच विश्वास नाही.

गुजरातमध्ये तौकते चक्रीवादळाने थैमान माजले होते, त्यावेळी केंद्र सरकारकडून गुजरात सरकारला 1 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. तशीच मदत महाराष्ट्राला सुद्धा करण्यात यावी. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी या रकमेचा धनादेश केंद्र सरकारकडून घेऊन यावा असेही सामनातून लिहिण्यात आले आहे.

म्हाडाच्या माध्यमातून तळियेत मदत हे आम्ही आधीच सांगितले
मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणे गरजेचेच असते. परंतु, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ केंद्रीय मंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा फौजफाटा तळिये येथे पोहोचला. राज्यपाल सुद्धा निघाले. तिकडे मदतकार्य सुरू आहे आणि हे लोक राजकीय पर्यटनाचे गोंधळात गोंधळ करत आहेत. त्यातच तळिये गावाचे पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून होणार हे राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आधीच सांगितलेले. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे तळियेत जातात आणि पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधण्याचे आश्वासन देतात. इथे प्रश्न मदत कोण करणार किंवा कुणाची मिळेल असा नाही. या संकट काळात विकोधकांनी मढ्यावरचे लोणी खाण्याचे प्रयत्न करू नये असे शिवसेनेने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...