आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराडांना मंत्रीपद पंकजांविरुद्धचा डाव:पंकजा मुंडेंना 'संपूर्ण खतम' करण्यासाठीच कराड यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले; जावडेकर, प्रसादांना धक्क्यातून सावरण्याचे बळ मिळो! शिवसेनेचे खोचक विश्लेषण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात बदल करण्यात आले त्यावर शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून खरमरीत विश्लेषण केले आहे. भागवत कराड यांना केंद्रात मंत्रिपद देऊन पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना पुन्हा डावलण्यात आले. खरं तर कराडांना मंत्रिपद दिले, 'हा पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा डाव आहे.' असे शिवसेनेने लिहिले आहे. तर दुसरीकडे, रवीशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना डच्चू दिला. त्या दोघांनाही या धक्क्यातून सावरण्याचे बळ मिळो अशा खोचक शब्दांत शिवसेनेने आपले मत व्यक्त केले आहेत.

शिवसेनेने आपले मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात लिहिल्याप्रमाणे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलांना मेगा सर्जरी अशा उपमा दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात ही सर्जरी वगैरे काहीच नाही. सर्जरी असती तर खऱ्या अर्थाने देशात वाढत्या महागाई आणि पेट्रोल डीझेलचे वाढते भाव पाहता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची उचलबांगडी करायला हवी होती. नवीन मंत्रिमंडळात बरेचसे चेहरे मूळचे भाजपचे किंवा संघाशी संबंधित नाहीत. ते केवळ ओंडके आहेत. ज्येष्ठ मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासह प्रकाश जावडेकर यांची हकालपट्टी करण्यात आली. त्या दोघांनाही या मोठ्या धक्क्यातून सावरण्याचे बळ मिळो. तर नारायण राणे यांना आणखी चांगले मंत्रीपद मिळायला हवे होते असे शिवसेनेने म्हटले आहे.

वंजारा समाजात फूट पाडण्याचा डाव
मुंडे भगिनींवर बोलताना शिवसेनेने लिहिले, 'श्री भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री करण्यात आले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे.' अर्थातच मोदींच्या मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाली तेव्हा प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. मराठवड्यातून त्यांना केंद्रात मंत्री केले जाणार अशा बातम्या झळकल्या. त्यानंतर पंकजा मुंडेंनी या वृत्ताचे खंडन केले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, कराड सुद्धा वंजारी समाजातील नेते आहेत. अशात पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांना डावलून कराड यांना जागा देण्यात आली. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी हा कटकारस्थान असल्याची शंका शिवसेनेने उपस्थित केली. यासोबतच, पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठी भाजपने असे केले असेल का? असा सवाल देखील शिवसेनेने उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...