आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांनी विचार करून बोलायला हवे होते:भुजबळांची सडेतोड भूमिका; सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेने पवारांना कळवावा

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायला तयार आहे, अशी भूमिका दुपारी संजय राऊत यांनी मांडली. याचा भुजबळांनी आपल्या शैलीत समाचार घेत, राऊतांनी विचार करून बोलायला हवे होते, अशी टोलेबाजी केली. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांचे नेते संजय राऊत यांनी जेही वक्तव्य केले त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राहायचे का नाही, याबाबत त्यांचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कळवावा. चर्चेने एकत्र बसून प्रश्न मिटला असता, हे सांगायलाही भुजबळ विसरले नाहीत.

आम्ही विरोधी बाकावर बसू

भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजिबात काळजी करीत नाही. विरोधी पक्षात बसून लढण्याची आम्हाला चांगली सवय आहे. आमची तयारी आहे त्यांना जे काही सांगायचे ते त्यांनी शरद पवार यांना सांगावे असेही भुजबळ म्हणाले.

भाजपसोबत जावे अशी मागणीच नाही

भुजबळ यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेबद्दल मी काहीही बोलणार नाही. ते आमचे सत्तेतील सहयोगी आहेत. राष्ट्रवादी आमदारांची भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची मागणी आमदारांनी केली का? याविषयी भुजबळ म्हणाले, भाजपसोबत राष्ट्रवादीने जावे अशी कोणतीही मागणी आमच्या आमदारांची नाही.

एकत्र येत प्रश्न सोडवला असता

भुजबळ म्हणाले की, संजय राऊत यांनी जे विधान केले त्याचा त्यांनी विचार करायला हवा होता. पक्षात एकमेकांवर कुरघोडी केली जाते, ती चालतेच, आज जो प्रसंग उभा आहे त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, हा प्रश्न चर्चा करुन मिटू शकला असता. महाविकास आघाडीकडे त्यांनी त्यांची भूमिका कळवावी, वेगळी वाट धरायची असेल तर शिवसेना धरु शकते.

गद्दारांना जागा दाखवू - राऊत

शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यात गद्दार आमदार सहभागी झाले नाही पण या गद्दारांना गाडून आम्ही आमचा भगवा फडकवणार आहोत. स्वार्थी लोकांनी गद्दारी केली तरी आम्ही शाबुत आहोत, संजय राऊत विचारपुर्वकच बोलले असेल.

बातम्या आणखी आहेत...