आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राऊत-पटोलेंमध्ये वाक् युद्ध:ठाकरे सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे; नाना पटोलेंचा संजय राऊतांना इशारा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊतांकडून शरद पवारांना यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देण्यात यावे असे वक्तव्य केले होते. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते संजय राऊतांमध्ये वाक् युद्ध सुरू झाले आहे. आता त्यांनी शिवसेनेला थेट इशाराच दिला आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी असे पटोले म्हणाले आहेत.

संजय राऊतांकडून शरद पवारांना यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. यावरुन काँग्रेसकडून राऊतांवर निशाणा साधला जात आहे. शनिवारी भिवंडी येथे माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी या विषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही गोष्ट शिवसेनेने लक्षात ठेवावी असा इशाराच नाना पटोलेंनी राऊतांना दिला आहे. तसेच यूपीएच्या अध्यक्षपदासाठी राऊतांकडून सुरु असलेली शरद पवारांची वकिली त्यांनी थांबवायला हवी असेही पटोले म्हणाले.

...ही हस्यास्पद मागणी आहे

दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये काही आलबेल नसल्याचे चित्र यावरुन दिसत आहे. नाना पटोले पुन्हा एकदा म्हणाले की, संजय राऊत यांची वक्तव्य पाहता ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत हा प्रश्न पडला आहे. पुढे पटोले म्हणाले की, दिल्लीमध्ये यूपीए 2 स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि यासाठी नेतृत्त्व शरद पवारांना द्यावी ही हस्यास्पद मागणी आहे. तसेच शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षात आहेत की शिवसेनेत हे तपासावे लागेल. तर राऊत हे शिवसेना नेते आहेत, सामनाचे संपादक आहेत मात्र ते शरद पवारांचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत' असा टोला पटोलेंनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...