आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Shiv Sena Spokesperson Mhatre And A. Surveen's 'That' Video Heated Up Politics, Three Were Arrested, One Was Beaten Up By The Shinde Group

शिवसेना प्रवक्त्या म्हात्रे व आ. सुर्वेेंच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राजकारण तापले:तिघांना अटक, एकास शिंदे गटाची मारहाण

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर तिघांना अटक, एकास शिंदे गटाची मारहाण

शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या एका व्हिडिओवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या व्हायरल व्हिडिओसोबत घाणेरडा मजकूर लिहिला गेल्याने दहिसरमध्ये शिवसैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन जणांना अटक करण्यात केली आहे. व्हिडिओ अपलोड केल्याच्या संशयावरून शिंदे गटाच्या कार्यककर्त्यांनी राजेश गुप्ता नावाच्या एका काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मुख्यमंत्री शिंदे यांच्या दहिसरमधील रॅलीतील आहे. मात्र तो मॉर्फ केल्याचा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या व्हिडिओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी शनिवारी रात्रीच दहिसर पोलिस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातला.

काँग्रेस कार्यकर्त्याला सुर्वे समर्थकांची मारहाण : शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मुंबईचा कांदिवलीमध्ये मारहाण केली. राजेश गुप्ता असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. दरम्यान, मारहाण करून नंतर गुप्ता यांच्याविरोधात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी तक्रारही दाखल केल्याने पोलिसांनी त्यास अटक केली. प्रकाश सुर्वे यांच्या समर्थक महिला कार्यकर्त्या राजेश गुप्ता यांच्या घरी जाऊन विचारपूस करत असताना राजेशने महिलांवर हात उचल्याचा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी गुप्ता विरोधात समता नगर पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुप्ता यास अटक केली आहे.

राजेश गुप्ताच्या अटकेपूर्वी दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. अशोक मिश्रा आणि मानस कुवर अशी त्यांची नावे असून त्यांनी या वादग्रसत व्हिडिओचा प्रसार केल्याचा आरोप आहे. आलेल्या दोघांची नावं आहेत.

व्हिडिओसोबत अश्लील मजकूर लिहिल्याने कार्यकर्ते संतापले विरोधकांचे खालच्या पातळीचे राजकारण या प्रकाराबद्दल शीतल म्हात्रे म्हणाल्या, विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जातील, असे वाटले नव्हते. सोशल मीडियावरील मातोश्री नावाच्या अकांऊटमधून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. मातोश्री नावाच्या पेजवरुन महिलेची अशी बदनामी करणे, विरोधकांना शोभते का?

आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवणं हा बेशरमपणा : प्रियंका चतुर्वेदी शीतल म्हात्रे यांनी मातोश्री या ग्रुपवरून मॉर्फ व्हिडिओ व्हायरल झाला असून हे ठाकरे गटाचे कारस्थान असल्याचा आरोप केला होता. यावर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या ‘आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवणं म्हणजे बेशरमपणा आहे. त्यांना वाटतं की आमच्याकडे काही उद्योग नाही. ज्यांनी स्वत:च नाव बदनाम केलेय. जे ५० खोके खाऊन काम करतायेत, आम्ही त्यांच्यासाठी व्हिडिओ का बनवणार?”, असा सवालही चतु्र्वेदी यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...