आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चक्रीवादळ:'चक्रीवादळ आणि महामारीदरम्यान राजकारण करणे घृणास्पद';शिवसेनेचा 'सामना'तून भाजपवर वार

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेने निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यावर भाजपने टीका केल्यामुळे निशाना साधला. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या संपादकीयमध्ये लिहीले की, पवार नेहमी जागरुक असतात, त्यामुळे त्यांचे राजकारण नेहमी चांगले असते. जेव्हा महाराष्ट्र कोव्हिड-19 आणि निसर्ग चक्रीवादळाच्या विळख्यात होते, अशा परिस्थिती भाजपने राजकारण करणे घृणास्पद आहे.

केंद्र सरकारने कोणतीच मदत केली नाही

शिवसेनेने म्हटले की, केंद्र सरकारने चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसाठी कोणतीच मदत केली नाही. राज्यात राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्तेत आहे. पवार यांनी मागील दोन दिवसात राययड आणि कोकणचा दौरा करुन नुकसानीचा आढावा घेतला. यावर महाराष्ट्र भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले होते की, पवार आता जागे झालेत का ? 

रात्रीच्या शपथविधीवरुन भाजपला चिमटा

शिवसेनेने म्हटले की, "पवार नेहमी जागे असतात, म्हणून त्यांची राजकीय वेळ-गणना नेहमीच बरोबर असते. सहा महिन्यांपूर्वी भाजप नेते रात्री जागले होते आणि सकाळी शपथ घेतली होती. पण, पवारांनी दोन दिवसात मात दिली. त्या शपथविधीनंतर भाजप नेते जागे आहेत आणि परत सत्तेत येण्याची वाट पाहत आहेत. जेव्हा महाराष्ट्र कोव्हिड-19 चे संकट आणि निसर्ग चक्रीवादळाचा सामना करत होता, तेव्हा भाजपने राजकारण करणे, अतिशय घृणास्पद आहे."

निवडणुकीमुळे पंतप्रधानांनी केला पश्चिम बंगाल दौरा

शिवसेनेने पंतप्रधानांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावरही टीका केली आहे. ते म्हाले की, "चांगली बाब म्हणजे, पंतप्रधानांनी बंगालमध्ये जाऊन चक्रीवादळ अम्फानमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. निसर्गमुळे महाराष्ट्रातही नुकसान झाले, पण केंद्राला महाराष्ट्रात यावे वाटले नाही. बंगलाच्या निवडणुका येत आहेत, त्यामुळेच भाजपने तिथे दौरा केला.''

बातम्या आणखी आहेत...