आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बोला...:भाजपच्या त्रासाला कंटाळून एकनाथ शिंदेंनी दिला होता राजीनामा, नव्या टीझरमधून शिवसेनेचा टोला

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युती सरकारच्या काळात भाजपच्या त्रासाला कंटाळून एकनाथ शिंदेंनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, अशी आठवण शिवसेनेने करुन दिली आहे. शिवसेनेने आज नवा टीझर जारी करुन 'आता बोला...' असा टोला मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

अस्सल कोण? खरी शिवसेना कुणाची? या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे. अशात उद्धव ठाकरे गटाने नवा टीझर जारी करत पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे.

बाळासाहेब ठाकरेंनीच दिला होता इशारा

टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे एक भाषण दाखवले आहे. त्यात बाळासाहेब शिवसैनिकांना उद्देशून म्हणतात, भाजपसोबतची युती आम्ही केवळ हिंदुत्वसाठी सहन करत आहोत. पण दरवेळी सहन करणार नाही. उद्या दुर्दैवाने युती तुटली तर आपण काय करणार? स्वबळावर शिवसेना निवडून आणाल का?

पुढे बाळासाहेब म्हणतात, भाजपसोबत आमचा झगडा जागांसाठी नाही. केवळ खुर्चीसाठी आमचा झगडा नाहीच. तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करा, आम्हाला फक्त महाराष्ट्र हवाय.

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर काही दिवसांनीच शिवसेना व भाजपमध्ये खटके उडायला लागले होते. तेव्हा भरसभेत भाजपच्या त्रासाला कंटाळून एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेच भाषण शिवसेनेच्या नव्या टीझरमध्ये दाखवले आहे. त्यात शिंदे म्हणतात, मी भाजपच्या मांडिला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर होणारे अत्याचार आम्ही उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. शिवसैनिक म्हणून मला प्रचंड वेदना होत आहेत. त्यामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.

बातम्या आणखी आहेत...