आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO शिवसेना तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है:आदित्य ठाकरेंना पाहताच चिमुकला धावला, शेक हँड करत केली घोषणाबाजी!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी करत आहे. त्यात आता गणेशोत्सव असल्यानी राजकीय मंडळी भेटीगाठीसाठी जास्तच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मग ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वजण गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपापल्या मतदार संघात गणेशोत्सव मंडळांना भेटी देत आहेत. यात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेही काही मागे नाही.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून गद्दारी केल्यानंतर स्थानिक पातळीवर आता शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे अनेक मंडळांना भेटीगाठी देत आहे.

ठाकरे बाप्पाच्या दर्शनासाठी

दरम्यान, आदित्य ठाकरे हे गिरगावमधील शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी, एका चिमुकल्याने आदित्य ठाकरे यांना पाहताच "शिवसेना तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्या चिमुकल्याच्या घोषणाबाजीवर "हम तुम्हारे साथ है" असे म्हटले. चिमुकल्याच्या या कृतीचे सर्व जण कौतुक करत आहे. चिमुकल्याचा उत्साह पाहून आदित्य ठाकरेंच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य पाहायला मिळाले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. त्यात आदित्य ठाकरे त्या चिमुकल्याला हात पकडून बाप्पाच्या दर्शनाला सोबत नेत आहे. तसेच "तू कोणत्या इयत्तेत आहेस" याची देखील विचारपूस आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.

शिवसेनेची मोर्चेबांधणी

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून 40 आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत जात राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. दरम्यान आता शिवसेनाला भक्कम करण्यासाठी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे स्थानिक पातळीवर प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे वेगवेगळ्या मतदारसंघात जात शिवसेनेचा प्रचार करताना पाहायला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...