आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास:राजकीय खड्डे शिवसेना पार करेल; शिवसेना पक्षप्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी (ता.४) मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाहतूक सेनेकडून तब्बल ११ हजार निष्ठेची प्रतिज्ञापत्रे सोपवण्यात आली. बंडखोर गटाला न्यायालयात शह देण्यासाठी शिवसेनेकडून सध्या प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. राजकीय खड्डे पार करू, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी ठाकरे म्हणाले, ‘आज तुम्ही ११ हजार प्रतिज्ञापत्रे सोपवली. ही तर केवळ सुरुवात आहे. मला एवढी प्रतिज्ञापत्रे पाहिजे की, तिकडे पुरावे सादर करण्यासाठी तुमच्या वाहतूक सेनेची मदत घ्यावी लागेल.

राज्यभरातील ट्रक, टेम्पो कमी पडतील एवढी प्रतिज्ञापत्रे मला मिळत असून एवढी आपली सदस्य संख्या वाढत चालली आहे. यामागे आपली सर्वांची मेहनत आहे. आपल्याकडे कुणी भाडोत्री माणसे नाहीत.

बातम्या आणखी आहेत...