आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना बैठक:भविष्यात शिवसेना देशाचे नेतृत्त्व करेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास; राम मंदिरावरुन भाजपवर साधले टीकास्त्र

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाबरी मशिद प्रकरणामध्ये शिवसेना रस्त्यावर उतरली होती, आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि काही आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भविष्यात शिवसेना देशाचे नेतृत्त्व करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

या बैठकीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'दुस-या राज्यांमध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. मात्र त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला यामुळे आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज परिस्थिती वेगळी असती. आरएसएस स्वातंत्र्य संग्रामात कुठेही नव्हती. मात्र भविष्यात शिवसेना देशाचे नेतृत्व करेल' असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

राम मंदिरावरुन भाजपवर टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राम मंदिरावरुन भाजपवर टीका केली आहे. 'रामाच्या नावाने काही लोक घरोघरी पैसे मागण्यासाठी जात आहेत. मात्र आपल्याला तसे करायचे नाही. बाबरी मशिद प्रकरणामध्ये शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आहे. "देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो" असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीका केली.

पाकिस्तानमध्ये भगवा फडकावा, आम्हाला आनंद
उद्धव ठाकरे म्हणाले की, नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये सत्ता स्थापन करणार असल्याचे म्हणतात. हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा, मग आम्ही तुमचे स्वागत करू. पाकिस्तानमध्ये भगवा फडकावा, आम्हाला आनंद होईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपवला लगावला आहे. टीव्हीनाइन या वृत्त वाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.