आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Shiv Sena's Big Contribution In Removing Obstacles In Ayodhya Ceremony, Chief Minister Uddhav Thackeray Will Definitely Go To Ayodhya, Raut's Information

राम मंदिर भूमिपूजन:अयोध्या सोहळ्यातील अडथळे दूर करण्यात शिवसेनेचं मोठं योगदान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नक्कीच अयोध्येत जातील, राऊतांची माहिती 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पुढे गेलं, राम मंदिराचं भूमिपूजन आवश्यक - संजय राऊत

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते5 ऑगस्ट रोजी होणार आहे. या मोठ्या सोहळ्यात कोण कोण उपस्थिती राहणार याकडे संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलं आहे. याच काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही या सोहळ्याचे निमंत्रण आले आहे. आता या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री अयोध्येला जाणार की नाही यावर अनेक चर्चा होत्या. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील अशी माहिती संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

या सर्व विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, राम मंदिराचं भूमिपूजन हे आवश्यक आहे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो को क्षण आता आलेला आहे. अयोध्येचा जो कार्यक्रम होत आहे तो एक शासकीय कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी अयोध्येला नक्कीच जातील, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ' शिवसेनेचं राम मंदिर या विषयाशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नाते आहे. एवढेच नाही तर आज जे भव्य राम मंदिर आणि सोहळा होत आहे त्यातील अडथळे दूर करण्यात शिवसेनेचं मोठं योगदान आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.