आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:बिहारमध्ये शिवसेनेचे डिपॉझिटच जप्त, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार; किरीट सोमय्या यांचा सवाल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किरीट सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने 23 उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यामुळे सध्या भाजप शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडणार नाही, हे स्पष्ट होते. त्यानुसार आता किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर पहिला वार केला आहे. किरीट सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एकूण 23 जागांपैकी 21 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली होती. बिहारमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. एक टक्काही मते मिळाली नाहीत. मग आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चमत्कार कुठे आहे असा सवाल विचारत सोमय्या यांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

मंगळवारी सकाळी बिहारमधील मतमोजणीला सुरुवात झाली होती. मात्र, मतमोजणीच्या संथ गतीमुळे निकालाचे चित्र स्पष्ट होण्यास मध्यरात्रीपर्यंतचा वेळ लागला. दरम्यानच्या काळात भाजप्रणित एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळाली. ताज्या आकडेवारीनुसार ‘एनडीए’ने बहुमताचा जादुई 122 आकडा पार केला आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 125 जागांवर एनडीए तर 110 जागांवर महागठबंधनचे उमेदवार विजयी ठरले.

बातम्या आणखी आहेत...