आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' असे म्हणत शिवसेनेकडून गुजराती समाजासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरी-ओशिवरा येथील गुजरात भवनमधील नवनीत हॉलमध्ये हा मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये 100 गुजराती व्यापाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी 11 गुजराती उद्योगपती शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करतील.
मुंबई महानगरपालिका निवडणुका समोर ठेवून शिवसेनेकडून आत्तापासून तयारी सुरु करण्यात आली आहे. गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना साद घालण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेसमोर भाजपचे मोठे आव्हान आहे. यामुळे शिवसेनेने मतदारांना जागृत करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेचा गड कायम राखता यावा यासाठी शिवसेना गुजराती बांधवांना आकर्षित करत आहे. दरम्यान शिवसेना ही निवडणूक एकटी लढणार की, एकत्रित लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.