आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधीमंडळ सभागृहात मुख्यमंत्र्यांची दोन भाषणे झाली. त्यांचे आजचे भाषण विधानभवनातील भाषण नव्हे, तर शिवाजी पार्कवरील भाषण होते. ते भ्रष्ट्राचारावर बोललेच नाही म्हणजे शिवसेनेची मतांसाठीची लाचारी दिसून आली. नवाब मलिकांचे समर्थन केले जात असेल तर या निमित्ताने बरे झाले मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर आला. महाविकास आघाडी सरकार उघडे पडले अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी कोणत्याच प्रश्नांवर उत्तर देत नाही. शेतकऱ्यांच्या वीजबीलाचा प्रश्न असो की, सुरज जाधवची आत्महत्या तरीही ठाकरे सरकार बोलत नाही. शेतकरी, गरीब वर्ग, मजूर, यूवांसाठी कोणतीही योजना नाही. विदर्भ, मराठवाड्यासाठी वॉटरग्रीड योजनेबद्दलही विचार नाही. पेशंट आयसीयूत आहे पण तो जीवंत असल्याचे भासवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
विदर्भ मराठवाड्यात तरतूदी दाखवायच्या पण खर्च करायचा नाही ही महाविकास आघाडीची मोड्स आहे. या अधिवेशनात कोणतेही ठोस निर्णय नाही. सरकारकडून दिलासा नाही, पेट्रोल डीझेलवर कर सरकारने कमी केला नाही. महाविकास आघाडी सरकार या मुद्द्यावर दुटप्पी आहे असेही ते म्हणाले.
अफजल गुरूच्या फाशीला विरोध करणारे मुख्यमंत्र्यांसोबत
देशाची आवश्यकता म्हणून आम्ही मुफ्तींसोबत गेलो. पण अफजल गुरूला फाशी देऊ नका म्हणणारे लोक तुमच्यासोबत बसले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे टोमणे बाँम्ब हे सर्वात मोठे शस्त्र आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.
फडणवीस म्हणाले, मराठी शाळा बंद झाल्या हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नाही. कोरोनात सर्वात जास्त मृत्यू यावर ते बोलले नाही. नवाब मलिकांचे समर्थन उद्धव ठाकरे करीत आहे याचे दुखः आहे. मलिकांनी बाँम्बस्फोटाच्या आरोपीसोबत व्यवहार केला. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर व्यवहार केला. मुंबईच्या गुन्हेगारांच्या आरोपींशी व्यवहार त्यांनी केला तरीही राजीनामा न घेता नवाब मलिकांचे समर्थन मुख्यमंत्री करीत आहेत याचे अतीव दुखः आहे असेही ते म्हणाले.
पारदर्शी कारभारामुळे आम्ही आरशासमोर
महाराष्ट्रावर आम्ही टीका करीत नाही, तुम्ही महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांच्या टोमण्यावर फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पारदर्शी कारभार केला म्हणून आम्ही आरशासमोर उभे राहीलो. मी पुराव्यानिशी मांडलेल्या प्रश्नांवर उत्तरे सरकारने दिली नाही असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.