आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Shiv Sena's Hindutva Does Not Light The House, It Burns The House: Uddhav Thackeray; Sangh Criticizes Fadnavis, Mocks Raj Thackeray As 'Munnabhai'

शिवसेनेची मास्टर सभा:उद्धव ठाकरे म्हणाले - आमचे हिंदुत्व घर पेटवणारे नाही, घरातील चूल पेटवणारे; संघ, फडणवीसांवरही टीका

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमचे हिंदुत्व घर पेटवणारे नाही, घरातली चूल पेटवणारे असून हिंदुत्व श्वास अन् मराठी आमचा प्राण आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपवर हल्ला चढवला. खोट्या मार्गाने आमच्या मागे लागाल, तर हा महाराष्ट्र असा पेटेल, की पळता भुई थोडी होईल, असा इशाराही त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्याबद्दल दिला.

वांद्रे कुर्ला संकुलाच्या मैदानावर शिवसेनेची शनिवारी (१४ मे) रात्री मास्टर सभा पार पडली. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने घेतलेल्या या सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कोरोना काळानंतरची शिवसेनेची ही पहिला जाहीर सभा होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेत प्रथमच मास्क काढून मार्गदर्शन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल या सभेद्वारे शिवसेनेने फुंकला.

व्यासपीठावर आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय राऊत, सुभाष देसाई आदी मंत्री उपस्थित होते. राज्यभरातून शिवसैनिक या सभेला आले होते. आदेश बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव यांचे धाकटे पुत्र तेजस या सभेला प्रथमच उपस्थित होते. काय म्हणाले उद्धव....

भाजप : अटलजी यांचा भाजप राहिलेला नाही
भाजप आमचा मित्र नसून तो शत्रू आहे. ते ओळखायला २५ वर्षे गेली. भाजप आता अटलजींची राहिलेली नाही. आमच्या आघाडीवर तीन पक्ष म्हणून टिका करता मग तुमच्या एनडीए मध्ये किती पक्ष होते? ते काय सर्व हिंदुत्ववादी होते का? उद्या दाऊद भाजपात आला तर तो गुणी होईल.

राणा दांम्पत्य : टीनपाटांना केंद्राची सुरक्षा
कुणाच्या हाती भोंगा तर कुणाला हनुमान चालिसा पठणला पाठवले जात आहे. ते मजा बघत बसणार. या टिनपाटांना केंद्र हल्ली वाय अन झेड सुरक्षा देत आहे. हे टिनपाट म्हणायच्या लायकीचे नाहीत. ते टमरेल आहेत.

नरेंद्र मोदी : मुंबई तोडण्याचा प्रयत्न हाणून पाडू
अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनमध्ये कोण प्रवास करणार आहेत. हे कोरोनावर बोलणार पण जीएसटीच्या पैशावर अवाक्षर नाही. यांना केवळ ओरबाडायचे आहे. हे थाळ्या वाजवायला सांगतात. धान्य फुकट दिले. अरे कच्चे खाणार का? ते शिजवायचे कसे? गॅसच्या किंमती पहा. मुंबई महाराष्ट्रपासुन तोडण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र असा पेटेल की पळता भुई थोडी होईल.

किरीट सोमय्या : बोबड्यांकडे लक्ष देऊ नका
बोबड्यांकडे लक्ष देऊ नका. याला क्रिकेटमध्ये स्लेजिंग म्हणतात. काम करण्याचे यांच्यात कर्तृत्व नाही. आपण करत असलेले काम त्यांना पचत नाही. बोंबलायचं असेल, तर कांजूरची जागा अडवली, तिथे जाऊन बोंबला. सॉसचा फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आले की याला केंद्राची सुरक्षा असताना याच्यावर हल्ला झालाच कसा? सुरक्षा तुम्ही दिली होती ना? मग आम्हाला काय विचारताय? सॉसची बाटली दिली कुणी त्यांना?

फडणवीस : गाढवाने लाथ मारण्याआधी बाजूला केले
ते म्हणतात, शिवसेनेचे हिंदुत्व ‘गधाधारी’ आहे. हो, होते. पण तो गधा आहे, हे लक्षात आल्यावर आम्ही अडीच वर्षांपूर्वी त्याला सोडून दिले. ती गाढवे घोड्याच्या आवेशात होती. त्याने लाथ मारायच्या अगोदर आम्ही बाजूला केले. तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले? बाबरी पाडायला गेला होतात, कारसेवा काय सहल होती ? मग तेव्हा बोंबललात का नाही. भोंगा तेव्हा होता ना. म्हणायचे की मी होतो, मी होतो, मी होतो.

जवाब मिलेगा, ठोकके मिलेगा : फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर तत्काळ देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम... अरे छट हा तर निघाला, आणखी एक ‘टोमणे बॉम्ब’ अशा शब्दात खिल्ली उडवून जवाब मिलेगा और ठोकके मिलेगा असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...