आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. यावेळी बोलताना भाजपमध्ये गेलेल्या भावना गवळी असतील किंवा प्रताप सरनाईक यशवंत जाधव असतील त्यांना क्लिन चीट मिळाली नाही. त्यांच्यावर चार्जशीट कधी दाखल करणार आहे. या प्रश्नाची किरीट सोमय्यांनी उत्तरे द्यावे, असे म्हणताना मविआवर जोरदार टीका करताना याच लोकांना आपण माफिया म्हणत टीका केली होती यांची आठवण करुन दिली. तर किरीट सोमय्या यांचे आपला तो फेकू आणि दुसऱ्यांचा तो पप्पू अशी परिस्थिती झाली आहे, असा टोला अंधारेंनी लगावला आहे.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर सुषमा अंधारे म्हणाल्या की, खासदार संजय राऊत ही शिवसेनेची लांब पल्ल्याची तोफ आहे. त्यांच्या बाहेर येण्याने शिवसेनेची उमेद वाढली आहे असेही अंधारेंनी म्हटले आहे.
ईडी सुडबुद्धीच्या राजकारणासाठी?
खासदार संजय राऊत यांची अटक ही बेकायदेशीर होती, असे कोर्टाने निरीक्षण नोंदवले आहे. कदाचित अशा पद्धतीने कारवाया करण्याची आणि बेकायदेशीर कारवाया करण्याची, ईडीची पद्धत आणि ईडीचा गुन्हा सिद्ध करण्याचा टक्का पाहिल्यानंतर अनेक प्रश्न पडतात असे अंधारेंनी म्हटले आहे. यानतंर त्यांनी ईडी सुडबुद्धीने कारवाया करण्यासाठी आहे का, ईडी आहे कशासाठी? केवळ राजकीय हेतूने विरोधकांवर सुडबुद्धीने कारवाई करण्यासाठी ईडी आहे का? ईडीची खरच गरज आहे का? यावर आता सभागृहात चर्चा व्हायला हवी असे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.
शिंदेंच्या मेळाव्याचा खर्च कोणाकडून?
खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील खर्चाचा हिशोब मागणाऱ्या लोकांनी मला सांगावे की, शिंदेंच्या मेळाव्याचा खर्च कोण करतंय असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे. तर किरीट सोमय्या तिकडे अनिल परब यांच्या बंगल्याचा फार लांबचा पल्ला आहे, तुम्ही मुंबईतील नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा घेऊन कधी येत आहात असे केले तर तुमचे शिष्यत्व पत्कारेल असेही सुषमा अंधारेंनी म्हणत सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.