आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:सत्तेत असतानाही शिवसेनेचे उत्पन्न 16 टक्क्यांनी घटून 111 काेटी रुपयांवर, निवडणूक आयाेगाच्या वार्षिक लेखा अहवालात दिली माहिती

मुंबई / विनोद यादव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचे उत्पन्न १५.५७ टक्क्यांनी घटून ते २०१९-२० या वर्षात १११.४० काेटी रुपयांवर आले आहे. शिवसेनेचे हे उत्पन्न त्या वर्षातील आहे ज्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली हाेती. ठाकरे यांनी २८ नाेव्हेंबर २०१९ राेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली हाेती. त्या आधीच्या २०१८-१९ व्यापारी वर्षात शिवसेनेचे उत्पन्न १३५.५० काेटी रुपये हाेते. ही माहिती स्वत: शिवसेनेने एप्रिल २०२१ च्या निवडणूक आयाेगाने दिलेल्या आपल्या वार्षिक लेखा अहवालात दिली आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेने ३१ मार्च २०२० राेजी संपलेल्या व्यापारी वर्षात आपले उत्पन्न १११.४० काेटी रुपये असल्याचे म्हटले आहे. यामध्ये शुल्क आणि नाेंदणीतून २५.३९ लाख रुपये, अनुदान, देणग्या आणि वर्गणीच्या माध्यमातून १०५.६५ काेटी रुपये आणि अन्य माध्यमांतून ५.५० काेटी रुपये मिळाले हाेते. त्याचप्रकारे ३१ मार्च २०१९ राेजी संपलेल्या आर्थिक वर्षात शिवसेनेला शुल्क आणि नाेंदणीतून ९०.४२ लाख रुपये, अनुदान, देणग्या आणि वर्गणीच्या माध्यमातून १३०.९६ काेटी रुपये आणि अन्य माध्यमांतून ३.६४ काेटी रुपये मिळाले हाेते.

शिवसेनेला दाेन वर्षांत १०० काेटी रुपयांपेक्षा जास्त देणगी इलेक्टाेरल बाँडमधून मिळाली
शिवसेनेने २०१९-२० वर्षात १११.४० काेटी रुपयांच्या दाखवलेल्या आपल्या उत्पन्नात ३६.७९ टक्के म्हणजे जवळपास ४०.९८ काेटी रुपयांच्या देणग्या इलेक्टाेरल बाँडमधून मिळाल्या आहेत. तर २०१८-१९ वर्षात इलेक्टाेरल बाँडमधून ४४.५८ टक्के म्हणजे जवळपास ६०.४० काेटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या हाेत्या. महत्त्वाचे म्हणजे आॅक्टाेबर २०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या हाेत्या. शिवसेनेने २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ५३.२७ काेटी रुपये खर्च केल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. त्यानुसार २०१९ मध्ये झालेल्या लाेकसभा निवडणुकीच्या काळात शिवसेनेने २४.३१ काेटी रुपये खर्च केेले हाेते. २०१९-२० मध्ये जाहिरातीवर ३.१४ काेटी रुपये खर्च केल्याची माहिती आपल्या वार्षिक लेखा अहवालात दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...