आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची 'मातोश्री'वर बैठक:भाजपचे खरे मनसुबे, चेहरे समोर येताय; शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकरांची टीका

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना पक्षप्रमुखांनी घेतला आढावा, विभागप्रमुखांसह महिला संघटकही होत्या उपस्थित

मातोश्रीवर आज शिवसेनेच्या मुंबईतील विभाग प्रमुखांसह महिला संघटकांची बैठक पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा कामाचा आढावा घेत, दसरा मेळाव्यासाठी काही सूचना केल्या आहेत, असे शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

काय म्हणाल्या पेडणेकर?
कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा झाला. मात्र, त्यावर उद्धव ठाकरे एक चकार शब्दही बोलले नाही असे सांगताना पेडणेकरांनी ठाकरेंनी केवळ आपल्या आपल्या कामांचा आढावा घेतला अशी माहिती दिली आहे. खरे मनसुबे आणि भाजपच्या लोकांचे खरे चेहरे आता समोर येत आहे. लोकांना सर्व गोष्टी दिसून येत आहे, त्यांना सर्व समजत आहे,असे म्हणत भाजपला इशारा दिला आहे.

अमेय घोलेंच्या केवळ स्वागत
अमेय घोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वागत केले म्हणजे ते शिंदेंच्या गटात गेले असे होते नाही, एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असे सर्व जण म्हणताय तर त्यांचे स्वागत करण्यात काही गैर नाही असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मनसे एक फिक्स नाही
मनसे-भाजप-शिंदे गट युतीच्या चर्चांवर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, राज ठाकरे आधी कुणाचे समर्थन करत होते, नंतर त्यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत विरोध केला त्यानंतर आता पुन्हा युतीच्या चर्चांमुळे त्यांची विविध रुप सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळे त्यात नवीन असे काही नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

संविधानावर विश्वास आहे

आमचा संविधानावचर विश्वास असून त्यांनी केलेल्या याचिकेकडे कसेच बघत नाही असे म्हणत पेडणेकरांनी आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असे सांगताना जे घडेल ते लवकरच समोर येईल असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...