आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक:दिवंगत पतीपेक्षा 34 टक्के जास्त मते मिळवून अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेच्या ऋतुजा लटके विजयी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • १२,८०६ मतांसह ‘नोटा’ दुसऱ्या क्रमांकावर, उर्वरित ५ उमेदवारांपेक्षा ५ हजार ५७२ मते जास्त

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव गटाच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्यापेक्षा ३४ टक्के जास्त मते मिळवून ऋतुजा विजयी झाल्या आहेत. ऋतुजा यांना ६६ हजार ५३० मते मिळाली, तर पती रमेश यांना मिळाली होती ६२,७७३ मते मिळाली होती. रमेश लटके यांना एकूण मतदानापैकी ४२.६७ टक्के मते मिळाली होती, तर ऋतुजा यांना एकूण मतदानाच्या ७६.८५ टक्के मते मिळाली आहेत. त्यानुसार ऋतुजा यांना ३४.१८ टक्के मते जास्त मिळाली.

दरम्यान, या निवडणुकीत ‘नोटा’ला (वरीलपैकी कुणीही नाही) मतदान करण्यासाठी प्रचार झाला. ‘नोटा’ला १२ हजार ८०६ (१४.७९) मते मिळाली, मात्र अपेक्षित परिणाम साधला गेला नाही. परंतु गतनिवडणुकीच्या तुलनेत नोटाच्या मतांमध्ये व टक्केवारीत लक्षणीय वाढ दिसून आली. गेल्या निवडणुकीत नोटाला ४ हजार ३११ (२.९३ टक्के ) मते मिळाली होती. विशेष म्हणजे उर्वरित पाच अपक्ष उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज केल्यास त्यापेक्षा ५ हजार ५७२ मते जास्त घेऊन ‘नोटा’ दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. शिवसेनेतील बंडानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने सर्व देशाचे याकडे लक्ष लागून होते. भाजपने ऐनवेळी आपला उमेदवार मागे घेतल्याने या निवडणुकीतील रंगत कमी झाली परंतु मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव गटाला आपले बळही जोखता आले.

ऋतुजा यांना ६६ हजार ५३० मते; एकूण ७६.८५% मते, तर रमेश लटके यांना मिळाली होती ४२.६७% मते
अंतिम निकाल : उमेदवारनिहाय मतदान आकडेवारी
{ ऋतुजा लटके (शिवसेना उद्धव गट) : 66,530
{ बाला नाडार (आपकी अपनी पार्टी) 1,515
{ मनोज नायक (राइट टू रिकॉल पार्टी) : 900
{ नीना खेडेकर (अपक्ष ) : 1,531
{ फरहाना सय्यद (अपक्ष) : 1,093 ६)
{ मिलिंद कांबळे (अपक्ष ) : 624 ७)
{ राजेश त्रिपाठी (अपक्ष) : 1,571

नोटा : 12,806 | अवैध मते 22 एकूण मते : 86,570

‘नोटा’मध्ये १२ टक्के वाढ
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ला ४,३११ मते मिळाली होती. ते प्रमाण एकूण मतदानाच्या २.९३ टक्के होते. यंदा १२,८०६ मते मिळाली. हे प्रमाण १४.७९ टक्के आहे. म्हणजे ११.८६ टक्के वाढली.

दिव्य मराठी विश्लेषण
भाजप, मनसे, शिंदे गटाचा ‘नाेटा’चा प्रचार; काँग्रेस-राष्ट्रवादीची मते शिवसेनेकडे

मनसे, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांनी ‘नोटा’चा (वरीलपैकी कुणीही नाही) छुपा प्रचार करूनही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत परिणाम मात्र मर्यादित राहिला. तसेच मुंबईत उद्धव गटाची ताकद दिसून आली आणि महाविकास आघाडीची मते ट्रान्सफर होऊ शकतात हेही नाट्यमय घडामोडींनी लक्षवेधी ठरलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या निकालाने रविवारी दाखवून दिले. २०१९ मध्ये युती असूनही सेनेचे रमेश लटके यांनी ६२,७७३ हजार मते घेतली होती. या निवडणुकीत पक्षाचे नवे नाव, नवे चिन्ह असतानाही आता उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराने ६६,५३० हजार मते घेतली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिली निवडणूक होती. आमदार-खासदार सोडून गेले तरी मतदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत हे या निवडणुकीत अधोरेखित झाले आहे. या निवडणुकीत नोटा डमी उमेदवार होता. मनसे, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांनी नोटाचा छुपा प्रचार केला होता. नोटाला सर्वाधिक मते पाडून आम्ही वेगळ्या पद्धतीने संदेश देऊ असा भाजपने येथे प्रयत्न केला होता.

पण, नोटला १२ हजार ८०६ म्हणजे केवळ १४.७९ टक्के मते मिळाल्याने हा प्रयत्न फसल्याचे निकालातून दिसून येते. तसेच राज्यातील लातूर ग्रामीणाचा नोटाचा विक्रम अंधेरीत मोडता आला नाही. अंधेरी-पूर्वचा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीची मते शिवसेनेकडे वळू शकतात, हे स्पष्ट झाले. या निवडणुकीत केवळ ३१.७४ टक्के मतदान झाले होते, तरीसुद्धा पूर्वीपेक्षा जास्त मते घेण्यात शिवसेना उमेदवार यशस्वी ठरला आहे. ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना ७६.८५ टक्के मते मिळाली आहेत. २०१९ मध्ये सेनेचे रमेश लटके यांना ४२.६७ टक्के मते होती.

बातम्या आणखी आहेत...