आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रध्‍दांजली पं. शिवकुमार शर्मा:शिवने संतूर शास्त्रीय बनवले, सहा दशकांची जुगलबंदी आता थांबली : पंडित हरिप्रसाद

मुंबई/दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतूरला शास्त्रीय ओळख मिळवून देणारे पंडित शिवकुमार शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. ते किडनीसंबंधित आजाराशीही संघर्ष करत होते. गेल्या सहा महिन्यांपासून डायलिसिसवर असतानाही ते सक्रिय होते. बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत शिव-हरी नावाने दोघांनी १९८१ मध्ये सिलसिला चित्रपटाला संगीत दिले होते. मात्र जुगलबंदी १९६७ पासून सुरू झाली. दोघांनी यश चोप्रांच्या ४ सह ८ चित्रपटांना संगीत दिले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार होतील.

‘डर’नंतर चित्रपटाला संगीत न देण्याचे ठरवले होते
माझे आणि शिवजींचे खूप जमायचे. आम्ही सोबत असू तेव्हा विशेष जवळीक जाणवत होती. कदाचित पूर्वजन्माचे नाते होते. पहिली भेट रेकॉर्डिंग स्टुडिओत झाली. त्यानंतर २४ तास सोबत घालवले. आमच्यात अनेक साम्य होते. उदा. मी वडिलांच्या मर्जीविरुद्ध मुंबईत होतो. शिवजींनीही जम्मूत वडिलांचे घर आणि आकाशवाणी नोकरीची ऑफर नाकारली होती. आम्ही दोघेही लोकवाद्य- बासरी आणि संतूरशी जोडलो होतो. शिवजींचे शास्त्रीय संगीतात जे योगदान आहे ते म्हणजे, संतूरसारख्या मर्यादीत क्षेत्रातील लोकवाद्यास शास्त्रीय संगीतात उच्च व एकमेव वाद्याचा दर्जा देण्याचे आहे. आज संतूरची ओळख शिवजी यांच्यामुळेच होते. मात्र, त्यांनी कधी याचे श्रेय घेतले नाही. शिव- हरी नाव पडण्याचीही रंजक कथा आहे. आम्ही जुगलबंदी तर १९६७ मध्ये सुरू केली होती. मात्र, १९७१मध्ये स्टॉकहोममध्ये एकत्र कार्यक्रम केला. त्याचा अल्बम प्रसिद्ध झाला तेव्हा कव्हरवर दोघांची पूर्ण नावे लिहिली होती. असे वाटत होते की एखादे होर्डिंगच चिकटावले आहे. यानंतर संक्षिप्त शब्दांत “शिव-हरी’ लिहिले होते. याच नावाने नंतर यशजींच्या आग्रहावरून स्वतंत्र स्वरुपात संगीतकार म्हणून सिलसिला चित्रपटाला संगीत दिले. नंतर चांदणी, लम्हे चित्रपट आले. परंतु, “डर’नंतर ठरवले की चित्रपटांना संगीत द्यायचे नाही. विशेषत: शास्त्रीय संगीत सोडून हे संगीत कधीच द्यायचे नाही. आज एक दीपक विझल्यावर अंध:कार पसरल्याची माझी भावना आहे. परंतु, मला खात्री आहे की ते कायम माझ्याजवळ, हृदयाजवळ राहतील.

बातम्या आणखी आहेत...