आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:शुभांगी पाटील यांनी बांधले शिवबंधन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार राहिलेल्या शुभांगी पाटील यांनी शनिवारी (४ फेब्रुवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तांबे पिता-पुत्रांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीने पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. उद्धव ठाकरेंशी मातोश्री येथे झालेल्या भेटीनंतर शुभांगी पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘आज मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. मी शब्दाला पक्की असते. मी त्यांना शब्द दिला होता. त्यानुसार आज मी शिवबंधन बांधले आहे, असे शुभांगी पाटील म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...