आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Shivjayanti 2022 | Cm Uddhav Thackeray Annousment Shiv Jayanti | Marathi News | 500 For Shivjanmotsav, 200 For Shivjyoti; Celebrate Shiva Jayanti By Following Corona Rules: CM

यंदाची शिवजयंती दणक्यात:शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी 500, तर शिवज्योतीसाठी 200 जणांना परवानगी; कोरोना नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करा : मुख्यमंत्री

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेलाच छेद, निर्णय मात्र मुख्यमंत्र्यांवर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येणार आहे. गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मान्यता दिली. यामुळे तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा शिवजयंती दणक्यात साजरी करता येणार आहे.

येत्या शनिवारी (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत.

शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत २०० तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत. तथापि, कोरोना नियमांचे पालन करून शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेवरून इतिहासतज्ज्ञांमध्ये होता वाद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेवरून इतिहासतज्ज्ञांमध्ये वाद हाेता. ताे साेडवण्यासाठी १९६६ मध्ये राज्य सरकारने इतिहासकारांची एक समिती नेमली हाेती. या समितीत महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, न. र. फाटक, आ. ग. पवार, ग. ह. खरे, वा. सी. बेंद्रे, ब. मो. पुरंदरे, मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता. मात्र ही समितीही जन्मतारखेबाबत निश्चित निर्णय घेऊ शकली नाही. २००० मध्ये आमदार रेखा खेडेकर यांनी उपलब्ध पुरावे आणि १९६६ च्या समितीचा अहवाल मांडून १९ फेब्रुवारी १६३० हीच जन्मतारीख असल्याचा ठराव विधिमंडळात मांडला, ताे मंजूर करण्यात आला. त्यानंतर २००१ पासून १९ फेब्रुवारीला अधिकृतपणे जयंती साेहळा साजरा केला जाताे.

दोन-दाेनदा शिवजयंती नको; शिवसेना आमदारांची मागणी

औरंगाबाद
इतिहासतज्ज्ञांनी १९ फेब्रुवारी १६३० हीच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख असल्याचे इतिहासाचे पुरावे देऊन सिद्ध केले हाेते. तत्कालीन सरकारनेही ते मान्य केले. त्यामुळे सन २००१ पासून राज्यात याच दिवशी शिवजयंतीचा उत्सव अधिकृतपणे १९ फेब्रुवारीला साजरा केला जात आहे. मात्र दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्वीप्रमाणे तिथीनुसारच शिवजयंती साजरी केली जाईल, असे तेव्हा ठणकावून सांगितले हाेते. ते हयात असेपर्यंत शिवसेनेने तिथीनुसारच (दरवर्षी फाल्गुन कृष्ण तृतीया) साेहळा साजरा केला. मात्र महाराजांची जयंती दाेनदा नव्हे तर एकाच दिवशी साजरी व्हावी, अशी मागणी असंख्य शिवप्रेमींकडून वारंवार हाेत आहे. शिवसेनेच्या तीन आमदारांनीही आता अशीच मागणी करून पक्षाला अडचणीत आणले आहे. इतकेच नव्हे तर औरंगाबादेत १९ फेब्रुवारीला साेहळ्याचे नियाेजनही केले आहे.

पक्षाचे प्रवक्ते तथा आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. आमदार दानवे, आमदार शिरसाट म्हणाले, ‘शिवजयंतीचा साेहळा दाेन वेळा साजरा हाेत असल्याने लाेकांचा गोंधळ होतो. अनेक संघटनांकडून एकाच दिवशी जयंती साजरी करण्याची मागणी हाेत आहे.

आमचीही अशीच मागणी आहे. जनभावनेचा विचार करुन सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहाेत. सरकार जाे निर्णय घेईल ताे आम्हाला मान्य असेल,’ असेही दानवे यांनी स्पष्ट केले. या वेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...