आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांच्या पराभव झाला आहे. भाजपचे धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. दरम्यान मुंबईत शिवसेना भवनासमोर छत्रपती संभाजीराजे यांचा समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरद्वारे संभाजीराजे यांच्या समर्थकांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "गनिमी कावा वापरून छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे आभार" असा मजकूर त्या बॅनरवर लिहण्यात आला आहे. सध्या हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी संजय पवार यांनी उमेदवारी दिली होती. तर भाजपने धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यात त्यांचा विजय झाला आहे. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाल्यामुळे शिवसेनेला आता मराठा संघटनाकडून तसेच संभाजीराजे समर्थकांकडून टार्गेट करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी शब्द मोडल्याचा आरोप
संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिवसेनेकडून त्यांना पक्षात प्रवेश करण्याची अट कायम ठेवण्यात आली होती. परंतु राजेंनी शिवसेनेत प्रवेश केला नाही. त्यानंतर शिवसेनेने पवार यांना उमेदवारी जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द मोडला, असा आरोप संभाजीराजे छत्रपतींनी केला होता. त्यामुळे आता या निवडणुकीत राजेंना डावलून दिलेला सेनेचा उमेदवार पराभूत होऊन भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.
स्वराज्य मे 2024 बाकी है
दरम्यान, मुंबईसह नवी मुंबईत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. या बॅनरच्या माध्यमातून शिवसेना व मुख्यमंत्र्यांना टोला लगावण्यात आला आहे. "शिवरायांच्या गनिमीकावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार, आज पुन्हा सिद्ध झाले महाराष्ट्र आमच्या बापाचा, राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे 2024 बाकी है!" असे म्हणत शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.