आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचा शहांवर पलटवार:आता मुख्यमंत्रिपदाचा संयमाचा मास्क नाही, दसरा मेळाव्यात सगळा हिशोब चुकता करणार

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या वाईटावर टपलेल्यांचा दसरा मेळाव्यात सगळा हिशोब चुकता करणार आहे, आता तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा संयमाचा मास्क नसेल. नासलेल्या लोकांपेक्षा मूठभर निष्ठावंत केव्हाही बरे. या मूठभरांच्या भरवशावर मैदान गाजवू, या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर हल्लाबोल केला. मातोश्रीवर शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.

मुंबईत काल आपण मंगलमूर्ती व अमंगलमूर्ती पाहिल्या. मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते. मंगलमूर्तीसमोर काही अभद्र बोलू नये. पण शिवसेनेला जमीन दाखवायची आहे, असे ते बोलून गेले. त्यांना काय बोलायचे ते बोलू देत, पण आपण भाजपला पालिका निवडणुकीत अस्मान दाखवू असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला. मुंबई दौऱ्यावर असताना अमित शाह यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना 'त्यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे', असे वक्तव्य केले होते.

ते म्हणाले की, शिवसेना ही काही माझी खासगी मालमत्ता नाही. मुख्यमंत्री पद जर मला पाहिजे असते तर एका क्षणात मी सोडू शकलो नसतो. माझ्याकडे तेक्हाही 30-40 आमदार होत. तेव्हाही त्यांना डांबून ठेवले असते. माझीदेखील ममता बॅनर्जीकडे ओळख होती. त्या आमदारांना तिकडे घेऊन गेलो असतो. किमान कालीमातेच्या मंदिरात नेले असते, राजस्थानात त्यांना नेता आले असते, पण तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे सर्वांना सांगितले की, दरवाजा उघडा आहे. राहायचे असेल तर निष्ठेने राहा नसेल तर तिकडे जा. पण मला एक समाधान आहे की, माझ्यासोबत जे आहेत ते कट्टर कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. हेच आपले शिवसेनेचे वैभव आहे.

तर मैदान जिंकू

हा संघर्षाचा काळ आहे. ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. पण या संघर्षाच्या काळात जो सोबत राहिला तो आपला. अशा निष्ठावंतांना कुणी विकत घेऊ शकत नाही. कारण निष्ठा हा असा विषय असतो की त्याची कितीही किंमत लावली, बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही. कोणी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे ही सर्व निष्ठावान मंडळी सोबत राहिली. शिवसेनाप्रमुख सांगायचे, पसाभर त्रासलेले लोक असण्यापेक्षा मूठभर निष्ठावान लोक असले तर मैदान जिंकू शकतो. त्यामुळे मला कसलीही चिंता नाही, असे ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...