आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सामना अग्रलेखातून सल्ला:भाजपची मगरमिठी स्विकारली तरच राज्याचे हित या भ्रमात चंद्रकांत पाटलांनी राहू नये : सामना अग्रलेख

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. भाजपची मगरमिठी स्विकारली तरच राज्याचे हित या भ्रमात पाटलांनी राहू नये, अशा शब्दात सामनातून चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आली आहे. प्रयत्न करुन, जोरजबरदस्ती करुन, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा म्हणाले होते. यावर विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये, असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नड्डा यांना आडवे जाणारे बालिश वक्तव्य केले. राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही. दुसरे असे की स्वतः फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत. मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? पाटील यांनी एक मान्य केले पाहिजे की, राज्यात सध्या जी व्यवस्था सुरु आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे व ती व्यवस्थाही राज्याच्याच हिताची आहे! भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये, असा इशारा सामनाच्या अग्रलेखात दिला आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानातही त्यांनी तोफांच्या नळकांड्यास बत्ती लावली आहे. मध्य प्रदेशचे सरकार पडले, तर राजस्थानचे सरकार सध्या तेथील राज्यपालांच्या बगलेत गुदमरलेले दिसत आहे. बहुमतात असलेली विरोधकांची सरकारे पाडायची ही आक्रमणाची पद्धत आहे. महाराष्ट्रात आक्रमणाचे मार्ग वेगळे आहेत हे सांगायची गरज नाही. असेही यात म्हटले आहे.

Advertisement
0