आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकीचा जाहिरनामा:केंद्र सरकारची जबाबदारी सर्व राज्यांच्या लोकांसाठी समान असू नये का? सत्ता आल्यास बिहारमधील नागरिकांना मोफत कोरोना लसीची घोषणेनंतर शिवसेनेचा सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. नुकताच येथील जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यामध्ये भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर आता राजकारण तापले असल्याचे दिसत आहे. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. याचा अर्थ भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील लोकांना कोरोनाची लस मिळणार नाही का? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर याविषयावरुन निशाणा साधला. 'कोरोनाची लस अजून आलेली नाही तरीही भाजपकडून मात्र त्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जातोय. कोरोनाच्या लसीच्या वाटपासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्याला नको का? असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपला विचारला.

बिहार विधानसभा निवडणुकांविषयी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. 'आत्मनिर्भर बिहार का रोडमॅप' या जाहिरनाम्यामध्ये एक लक्ष्य, 5 सूत्र आणि 11 संकल्पांचा उल्लेख आहे. 19 लाख लोकांना रोजगार देणे आणि बिहारमधील नागरिकांना फ्री कोरोना व्हॅक्सिनेशन दिली जाणार असल्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे.