आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे, संविधान बदलण्याचे छुपे अजेंडे भाजप कधीच पूर्ण होऊ देणार नाही

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना प्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाष्य केले आहे. डॉय बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरे याचें मनसुबे आहे. अशी टीका फडणवीसांनी केली. ते आज नागपूरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, 'तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपाला नाकारलं. तर तसे नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केले आहे. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. आतातरी उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा बाजूला सारुन सांगावे की, त्यांना मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा होती आणि ती पूर्ण झाली. दिलेला शब्दच जर पूर्ण करायचा होता तर इतर कोणा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आले असते. सुभाष देसाई, दिवाकर रावते यांना देखील मुख्यमंत्री करता आले असते. मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा नव्हती तर नारायण राणे, राज ठाकरेंना का बाहेर जावे लागले?

मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे, म्हणजे नक्की काय करायचं? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील' असे फडणवीस म्हणाले.

'काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. ही व्यवस्था बदलली पाहिजे असे त्यांनी सांगितले. म्हणजे नेमके काय? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच बदलण्याचे मनसुबे त्यांनी काल बोलून दाखवले. काहीही झाले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे बदलले जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही. त्यामुळे हे संविधान बदलण्याचे छुपे अजेंडे, काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन आणि तशाच डाव्या विचारांच्या काही पक्षांच्या सोबतीने हा जो मनसुबा तुम्ही रचताय, तो आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही.' असा थेट इशारा फडणवीसांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...