आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची चर्चा:राज्यपालांनी मुख्य सचिवांना बोलावून व्यक्त केली नाराजी, केंद्राला पाठवू शकतात राज्यातील परिस्थितीचा अहवाल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारविरोधात केंद्राकडे अहवाल पाठवणार?

राज्य सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या कंगना रनोटच्या कार्यालयावर कारवाई करत मुंबई महानगरपालिकेने कंगनाला दणका दिला आहे. या प्रकरणात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे. मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनोटच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या बांधकामाचा भाग पाडण्यात दाखवलेली घाई बाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल या वादाबाबत केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार असल्याची माहिती टीव्ही 9 ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

कंगना रनोटची वक्तव्ये आणि बंगला पाडल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव अजॉय मेहता यांना बोलावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रनौत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली, अशा शब्दात भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

दरम्यान बुधवारी सकाळी बेकायदा बांधकामांबाबत मुंबई महापालिकेने कंगनाच्या मुंबईस्थित कार्यालयावर हातोडा पाडला. ही कारवाई सकाळी 10.30 वाजता सुरू झाली आणि दुपारी 12.40 पर्यंत चालली. या ऑपरेशन दरम्यान, बाल्कनी आणि कार्यालयाच्या बाहेरील बाजूचे बांधकाम तोडण्यात आले आहे. यावेळी जवळपास राहणा-या काही लोकांनी या तोडफोडीला विरोधही केला होता. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.

महापालिकेच्या कारवाईनंतर सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आली आहे. तुम्ही सहमत आहात का?,असे ट्विट कंगनाने केले आहे.

कंगनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान

घरी पोहोचताच कंगनाने “हा लोकशाहीचा मृत्यू,” असे म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

कंगना म्हणाली, ''उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटते, चित्रपट माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर तोडून मोठा सूड उगवला. तुम्ही खूप मोठे उपकार केले आहे. काश्मिरी पंडितांसोबत काय घडले असेल, हे मला माहित होते. मात्र आज मला याची जाणीव झाली आहे. आज मी तुम्हाला एक वचन देते की, मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवेल. मी माझ्या देशातील लोकांना जागे करेन. ठाकरे जे क्रौर्य आणि दहशत माझ्याबाबतीत घडली आहे, त्याला नक्कीच अर्थ आहे. जय हिंद. जय भारत'', अशा शब्दांत कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.