आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा म्हणजे गजनी:अरविंद सावंत कडाडले; त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक, त्यांचे हात अन् विचारही काळे

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"अमित शहा हे गजनी सारखे आहेत, खूप उशिरा त्यांना आठवण येत असते, त्यामुळे संकोच कोण करतय आणि खोटं कोण बोलतय हे स्पष्ट कळतंय," असा हल्लाबोल सोमवारी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर केला.

सावंत म्हणाले, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेत ठामपणे यांनी आपली भूमिका मांडलेली आहेत. तेव्हा तुम्ही उत्तरे दिली नाहीत. आज पुन्हा मुंबईत येऊन कोळसा उधळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, तुमचे हात आणि विचारही काळे आहे.," ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

तुम्ही हरियाणात का गेलात?

सावंत म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला जर असे भाजपला वाटत असेल तर त्यांना माझा एक प्रश्न आहे की, तुम्ही हरियाणात का गेलात. तुझी दिलेला शब्द हे उद्धव ठाकरे सातत्याने सांगत होते, तेव्हा तो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मुंबईत आला नाहीत तुम्ही हरियाणात गेलात. सहा महिन्यांनंतर त्यांनी यावर भाष्य केले."

वाजपेयींची भाजप कुठे?

शिवसेनेला सोबत घेऊन भाजपने 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली. त्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना विधानसभा संदर्भात काही प्रश्न विचारले होते. सत्तेचे वाटप कसा होणार असा शब्द तुम्ही दिला होता. याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहे. ही शब्द पलटणारी भाजपा असून अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाजपात खूप मोठा फरक असल्याचेही सावंत म्हणाले.

उपकाराची जाणीव ठेवा

पुढे सावंत म्हणाले की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ती भाजपला विचारून थोडीच केली. त्यामुळे शिवसेनाही बाळासाहेबांच्या विचारांचीच आहे आणि ती तशीच पुढे जात आहे. मी एकच गोष्ट या ठिकाणी आठवण करून देईल की, उपकाराची जाणीव ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाळासाहेब ठाकरे यांनी जगवले त्यामुळे किमान याचे उपकार ठेवा.

भाजपचा भुईसपाट होणार

शिवसेना आणि मुंबई महानगर पालिका खासकरून मुंबईचे नागरिक यांचे नाते इतके घनिष्ठ आहे की, असे कोणी, कितीही वेलगणा करू द्या काहीच होणार नाही, असे आकडे त्यांना सांगायचे असतात. बंगालमध्ये, दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये भाजप भुईसपाट झालाय, त्याचप्रमाणे मुंबई पालिका निवडणुकीत देखील भाजपचा भुईसपाट होणार, असे प्रत्युत्तर अरविंद सावंत यांनी दिले आहे.

खोटे आश्वासन नकोय

पुढे सावंत म्हणाले की, मुंबईकरांना दुष्काळातही पिण्याचे पाणी हे मुंबई महानगर पालिकेमुळे मिळते. कोरोना काळात गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये कशाप्रकारे लोकांचे प्राण गेले हे जनता विसरू शकत नाही. गंगा ही प्रेतांनी वाहत होती. त्यांनी आता मुंबईकरांना खोटे आश्वासन देऊ नये.

बातम्या आणखी आहेत...