आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार:स्वत:च केली घोषणा; म्हणाल्या- राऊतांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली; मातोश्रीवरही खोके यायचे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांचा शिंदे गटातील प्रवेश निश्चित झाला आहे. पुढील 3 दिवसांत आपण अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश करू, अशी घोषणा दीपाली सय्यद यांनी केली आहे.

दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. त्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे, संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली, असे दिपाली सय्यद म्हणाल्या.

शिंदे देतील ती जबाबदारी स्वीकारणार

दिपाली सय्यद म्हणाल्या, शनिवारपर्यंत माझा शिंदे गटात प्रवेश होईल. तो कसा होईल, कुठे होईल, याची चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे माझ्यावर जी जबाबदारी देतील, ती स्वीकारण्यास मी पुर्णपणे तयार आहे.

राऊतांनी पक्ष फोडला

दिपाली सय्यद म्हणाल्या, संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली. पक्ष तोंडाने कसा फोडता येऊ शकतो, याचे चपखल उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. तसेच, शिंदे साहेबांनीच मला शिवसेनेत आणले. त्यामुळे त्यांच्यासोबत उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे.

खोक्यांच्या सुत्रधार रश्मी ठाकरे

दिपाली सय्यद म्हणाल्या, खोक्यांवरुन शिंदे सरकारवर टीका होत आहे. मात्र, मुंबई पालिकेतील खोके मातोश्रीवर येणे बंद झाल्याची खंत ठाकरेंना आहे. रश्मी ठाकरेच यातील प्रमुख सुत्रधार आहेत. या खोक्यांचा तपास होऊन सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.

सुषमा अंधारे चिल्लर

दरम्यान, सुषमा अंधारे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाल्यापासून दिपाली सय्यद शांत होत्या. आपल्या झंझावती भाषणांमधून शिंदे गटावर टीकेची झोड उठवत असल्यामुळे माध्यमांमध्ये केवळ अंधारे यांचीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे दीपाली सय्यद नाराज असल्याची चर्चा होती. यावर प्रतिक्रिया देताना दिपाली सय्यद म्हणाल्या, तसे काहीही नाही. सुषमा अंधारे हा माझ्यासाठी फार चिल्लर विषय आहे. एकनाथ शिंदेंमुळे मी शिंदे गटात जात आहे.

माणस किती पटकन बदलात- सुषमा अंधारे

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील दिपाली सय्यद यांना प्रत्युत्तर दिले आहे. माणस किती पटकन बदलतात, असा टोला अंधारेंनी लगावला आहे. अंधारे म्हणाल्या, माझ्या शिवतीर्थावरील भाषणानंतर याच दीपाली सय्यद यांनी माझे कौतुक केले होते. नारायण राणेंना चांगले प्रश्न विचारले, असे त्या म्हणाल्या होत्या. आता आपले करिअर घडवण्यासाठी ते शिंदे गटात जात आहे. त्यांना ते स्वातंत्र्य आहे. मात्र, ठाकरेंवर टीका करण्यापूर्वी त्यांनी आत्मचिंतन करावे.

बातम्या आणखी आहेत...