आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेची अजान स्पर्धा:मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी शिवसेना भरवणार अजान स्पर्धा; पांडुरंग सकपाळ यांची माहिती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजानला विरोध करणे गैर, शिवसेना नेते पांडुरंग सकपाळ यांचे मत

शिवसेनेच्या वतीने अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे. मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले. बसीरत ऑनलाइनशी संवाद साधताना पांडुरंग सकपाळ यांनी ही माहिती दिली. तसेच अजानला विरोध करणे चुकीचे आहे, असे मतही सकपाळ यांनी व्यक्त केले आहे.

अजानमध्ये गोडवा, यामुळे मनःशांती मिळते

पांडुरंग सकपाळ म्हणाले की, माझ्या घराजवळ मुस्लिम वस्ती आहे. यामुळे मला रोज अजान ऐकू येते. अजानमध्ये गोडवा असून त्यामुळे मनःशांती मिळते. त्यामुळे मुस्लिम समाजातील मुलांसाठी ही स्पर्धा घेण्याचे माझ्या मनात आले. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आवाज, उच्चार ते किती मिनिटांत अजान संपवतात, यासाठी मौलाना परीक्षकाचे काम पाहतील. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार असल्याचेही सकपाळ यांनी सांगितले.

महाआरतीप्रमाणेच अजानचे महत्त्व, विरोध करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे

काहींना अजानच्या आवाजामुळे त्रास होतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न विचारल्यावर सकपाळ म्हणाले की, सगळेच धर्मग्रंथ मानवता आणि शांततेची शिकवण देतात. अजान केवळ पाच मिनिटाची असते. त्यामुळे या पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अजानची परंपरा खूप जुनी आहे. ती कालपरवा सुरू झालेली नाही. त्यामुळे त्याला विरोध करणे गैर आहे. महाआरतीप्रमाणेच अजानचे महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचे ते प्रतिक आहे. त्यावर वाद घालणे उचित वाटत नाही, असेही सकपाळ म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser