आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्रा चाळ घोटाळ्यात अटक करण्यात आलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना सोमवारी पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मात्र, ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती. ईडीने न्यायालयात सांगितले की, आम्ही 3 वेळा समन्स पाठवले, पण राऊत मुद्दाम हजर झाले नाहीत. या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांमध्येही छेडछाड करण्यात आली आहे.
कोठडीच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे
या अटकेविरोधातील निदर्शने पाहता न्यायालयाच्या आवारात 200 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईडी कार्यालयाबाहेर 100 पोलीस तैनात करण्यात आले.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याला रात्री उशिरा 12 वाजता मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. साडेसहा तासांच्या चौकशीनंतर बुधवारी ईडीने ही कारवाई केली. राऊत रविवारी सायंकाळी 5.30 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले होते.
राऊतच्या अटकेनंतर त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचे सांगितले. अटकेबाबत आम्हाला कोणताही कागद देण्यात आलेला नाही. संजय राऊत यांना भाजप घाबरतो, म्हणून अटक करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी घेतली पत्रकार परिषद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. सर्वच दिवस सारखे नसतात. आता तुमची सत्ता आहे. पण, हे दिवस फिरले तर तुमचे काय होईल, याचा तरी विचार करा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. संजय राऊत यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईचा ठाकरेंनी तीव्र शब्दांत निषेध करुन संजय राऊत यांचा आपल्याला अभिमान असल्याचे म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
अटकेविरोधात राज्यभरात आंदोलने
संजय राऊत यांच्या अटकेविरोधात पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, जळगाव, औरंगाबाद येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी..
Live Updates
अखेरच्या 2 तासांची चौकशी ठरली महत्त्वाची
ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यव्रत कुमार यांनी काल म्हणजेच रविवारी संजय राऊत यांच्या अटकेच्या मेमोवर स्वाक्षरी केली होती आणि आज ईडी कोठडीनंतर सत्यव्रत हे इतर 4 अधिकाऱ्यांच्या पथकासह राऊत यांची अधिक चौकशी करणार आहेत.
सत्यव्रत कुमार रविवारी सायंकाळी उशिरा दिल्लीहून मुंबईत आले आणि त्यांनी एकूण 7 तास चौकशी केली. त्यात पत्राचाळ घोटाळ्याशी संबंधित चौकशी अखेरच्या 2 तासांची होती. पत्राचाळच्या एफएसआय घोटाळ्यातून मिळालेल्या मनी ट्रेलबाबत विचारणा केली. राऊत यांच्या घरातून सापडलेली 11.5 लाखांची रोकड, अलिबाग आणि दादर फ्लॅटचे आर्थिक व्यवहार आणि प्रकरण उघडकीस आल्यानंतर राऊत यांनी परत केलेले पैसे, याची माहिती मागवली.
प्रश्नांवर राऊत म्हणाले- आता आठवत नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारच्या चौकशीदरम्यान राऊत यांनी काही प्रश्नांच्या उत्तरात एकतर 'मला माहिती नाही' किंवा 'आता आठवत नाही' असे सांगितले, परंतु अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारीही त्यांनी दिलेल्या माहितीवर समाधानी नव्हते. ईडीने घेतलेल्या साक्षीदारांचे जबाब आणि मनी ट्रेलचे पुरावे यांच्याशी राऊत यांचे म्हणणे जुळत नाही. यामुळे त्यांना ईडीच्या कार्यालयात आणून अटक करण्यात आली. कोर्टात या मुद्द्यांच्या आधारे ईडी कोठडी मागणार आहे.
पैसे शिवसेनेचे, शिंदेंचेही नाव
राऊत यांच्या घराची झडती घेताना ईडीच्या पथकाच्या हाती साडे 11 लाख रुपयांची रोकड लागली होती. मात्र, यापैकी 10 लाख रुपये अयोध्या दौऱ्यासाठी जमवलेले शिवसेना पक्षाचे असून त्यात एकनाथ शिंदे यांचेही नाव लिहिले आहे, असे सुनील राऊत यांनी सांगितले.
राऊतांविरोधात विनयभंगाचा गुन्हा
ईडीच्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्याविरोधात रविवारी रात्री वाकोला पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. बलात्कार आणि हत्येची धमकी मिळाल्याची तक्रार पाटकर यांनी केली होती.
आई - पत्नीच्या डोळ्यात पाणी
संजय राऊत यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चाैकशी झाली. या वेळी राऊत यांची 84 वर्षीय आई ,भाऊ आमदार सुनील राऊत घरातच होते. सायंकाळी ईडी पथकासोबत राऊत बाहेर पडताना राऊत यांच्या आई आणि पत्नीच्या डोळ्यात अश्रू तरळले. या वेळी घराच्या खिडकीत उभ्या राहून या दोघींनी बाहेर जमलेल्या शिवसैनिकांना हात दाखवून आभार व्यक्त केले.
राऊत यांनी ‘आपण झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,’ असे स्पष्ट केले. गळ्यात भगव्या रंगाचा गमछा घातलेल्या राऊत यांनी घराबाहेर येताच हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले.
थोडक्यात समजून घ्या पत्रा चाळ प्रकरण
ईडीच्या कचाट्यात अडकलेले आघाडीचे नेते
ईडीच्या कचाट्यात अडकलेले शिंदे गटाचे नेते
अर्जुन खोतकर, माजी मंत्री प्रताप सरनाईक, आमदार, भावना गवळी, खासदार यशवंत जाधव - मुंबई महापालिकेचे स्थायी समिती माजी अध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.