आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द कश्मीर फाईल्स'वरुन वाद:370 कलम काढल्यानंतरही काश्मिरी पंडितांची घरवापसी का होऊ शकली नाही? संजय राऊतांचा भाजपला सवाल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावरून उठलेल्या वादाचा धुराळा अद्याप शांत होण्याची चिन्ह नाहीत. या चित्रपटाचा संदर्भ देत काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, गृहमंत्री अमित शाहा यांनी काश्मिरातील 370 कलम मोठ्या हिमतीने रद्द केले. नंतर काश्मिरला सरळ केंद्रशासित राज्य बनवले. या प्रांताचा मुख्यमंत्रीसुद्धा एक हिंदुच असेल, असे स्पष्ट वक्तव्य गृहमंत्री अमित शाहा यांनी केले होते. नव्वदच्या दशकात परागंदा झालेल्या काश्मिरी पंडितांची घरवापसी हा मोदी सरकारचा मोठा कार्यक्रम होता. मात्र, 370 कलम काढल्यावरही पंडितांची घरवापसी अद्याप होऊ शकली नाही. हे कोणाचे अपयश आहे?

चित्रपटाच्या माध्यमातून इतिहास बदलण्याचा प्रयत्न
शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातील 'रोखठोक' या सदरातून हा प्रश्न विचारला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 'द कश्मीर फाईल्स' सारखे अभ्यासक चित्रपट व्हायला हवेत. पण हा चित्रपट सगळ्यांसाठी वादाचा मुद्दा ठरला आहे. द कश्मीर फाईल्सचे दिग्दर्शकानेच 'द ताश्कंद फाईल्स' चे दिग्दर्शन केले आहे. लाल बहाद्दूर शास्त्रींच्या मृत्यूला फक्त गांधी परिवार जबाबदार असल्याचा प्रपोगंडा या चित्रपटातून करण्यात आला. आपल्या देशाचा संपुर्ण इतिहास हा फक्त पुस्तकाच्या माध्यमातुनच नव्हे तर आता तो चित्रपटाच्या माध्यामातुनही बदलवण्याचा प्रयत्न होत आहे, असेदेखील संजय राऊत म्हटले.

'रोखठोक'मध्ये संजय राऊत यांनी उपस्थित केलेले प्रश्न
-
काश्मिरी पंडितांचे पलायन व त्यांच्या हत्या यादरम्यान दिल्लीत व कश्मीरात कुणाची राजवट होती?

- काश्मीरातील अतिरेकी संघटनांशी सरळ हातमिळवणी करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती व त्यांच्या पक्षाशी युती करून भाजपने जम्मू-काश्मिरात सरकार कसे स्थापन केले?

- पाकव्याप्त काश्मीर पुन्हा जिंकून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तुमच्या घोषणेचे काय झाले?

- निर्वासित काश्मिरी पंडितांच्या मुलांचे शिक्षण रखडू नये, त्यांना समाजात उभे राहता यावे म्हणून शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात पाच टक्के जागा राखीव ठेवल्या. भाजपशासित इतर राज्यांनी हा असा निर्णय कधीच का घेतला नाही?

- 2019 च्या निवडणुकीच्या आधी काश्मीर खोऱ्यात झालेला पुलवामा हल्ला. 40 जवानांना त्यात वीरमरण आले. हे चाळीस जवान पंडित नसले तरी, पण एकाच वेळी इतक्या जवानांना वीरमरण कोणाच्या चुकीमुळे आले?

- काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? की त्यांचा आक्रोश, त्यांचे पलायन, त्यांचा रक्तपात यावर राजकारणच होत राहणार.

बातम्या आणखी आहेत...