आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविकास आघाडी Vs राज्यपाल:राज्यपालांविरोधात आम्ही संघर्ष करत नाही, त्यांनाच खाजवायची सवय- खा. संजय राऊत, वक्तव्यावर भाजपचा आक्षेप

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामधील संघर्ष अजूनही शमलेला नाही. याबाबत नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता चांगलाच गदारोळ उठला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
नवी दिल्ली येथे आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राज्यपालांशी आम्ही संघर्ष करत नाही. त्यानांच खाजवायची सवय आहे. एवढी खाज त्यांना यापूर्वी कधी आली नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली.

ही भाषा संजय राऊतांनाच शोभू शकते - आशिष शेलार
खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांबाबत असे वक्तव्य करताच भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. अशी भाषा केवळ संजय राऊत यांनाच शोभू शकते. महाराष्ट्राची अशी भाषा नाही, अशी संस्कृतीही नाही. त्यामुळे राऊत यांच्या भाषेबद्दल जास्त बोलणार नाही, असे शेलार म्हणाले. त्यावर शिवसेनेचे विनायक राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला संस्कृतीबद्दल सांगू नका. तुमची टीवटीव बंद करा, असे राऊत यांनी शेलारांना सुनावले. ​​​​​

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरून सुरू झाला वाद
विधान परिषदेमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या 12 सदस्यांच्या नावाला राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. विशेष म्हणजे यामध्ये एक नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही आहे. यामुळे महाविकास आघाडी व राज्यपालांमधील संघर्ष अनेकदा टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले.
नियमानूसार, मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात आमदारकी मिळवावी लागणार होती. यासाठीच विधानपरिषदेसाठी इतर 11 सदस्यांसह त्यांचे नावही राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. मात्र, आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही राज्यपालांनी या नावांना अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने राज्यपालांविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी आता सुनावणी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...