आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराINS विक्रांतच्या नावाखाली सर्वसामान्यांकडून 56 कोटी गोळा करून जनतेला फसवणाऱ्या किरीट सोमय्या व त्यांच्या मुलाला जेलमध्ये जावेच लागणार. माझे वाक्य नोंद करून ठेवा, असा इशारा आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला. किरीट सोमय्या हा महाराष्ट्रद्रोही तर होताच. पण, देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपला जाब विचारावाच लागेल, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
जो केंद्राला प्रश्न विचारतो, तो गुन्हेगार बनतो!
गुन्हे प्रक्रिया कायदा दुरुस्ती विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी कायद्याच्या गैरवापराबद्दल आसूड ओढले. नव्या कायद्याचा गैरवापर होणार नाही हे गृहमंत्री म्हणत आहेत. मग सध्या देशात काय सुरू आहे, असा सवाल त्यांनी केला. 102 वर्षांपूर्वींचा कायदा बदलला जातोय. मन स्वच्छ असेल तर विरोध करण्याचे कारण नाही. पण गुन्हेगार कोण आहे? जो तुम्हाला प्रश्न विचारणार तो गुन्हेगार बनतो, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच, गुन्हे प्रक्रिया कायद्यामध्ये होणारे बदल चांगले आहे. मात्र, या कायद्याचा गैरवापर होणार नाही. हे तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकाल काय, असा सवालही संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला.
मुंबईत आज शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
संजय राऊत आज दिल्लीहून मुंबईत येणार आहेत. मुंबई विमानतळापासून ते राऊत यांच्या भांडूपमधील घरापर्यंत राऊत यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले जाणार आहे. केंद्र आणि राज्याविरुद्धचा संघर्ष पेटलेला असतानाच यानिमित्ताने मुंबईत शिवसेनेतर्फे आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.