आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा पोटनिवडणूक:मिशन दादरा-नगर हवेली, शिवसेनेची दिल्लीच्या दिशेने झेप व्हाया दादरा-नगर हवेली; खासदार संजय राऊत यांचे ट्विट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दादरा-नगर हवेली येथीस लोकसभा पोटनिवडणूकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, या निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. केंद्रशासित प्रदेशात शिवसेनेचे यश यामुळे महाराष्ट्राबाहेर महिला खासदार शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत शिवसेनेने दिल्लीच्या दिशेने झेप घेतली. असे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'महाराष्ट्राबाहेर पहिले पाऊल दिल्लीच्या दिशेने झेप व्हाया दादरा-नगर हवेली' असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. सोबतच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आपला फोटो देखील त्यासोबत शेअर केला आहे.

काही दिवसांपुर्वी अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे दादरा-नगर हवेली येथे पोटनिवडणूक पार पडली होती. यामध्ये भाजप आणि शिवसेनेने चांगली कंबर कसली होती. शिवसेनेने आपला उमेदवार म्हणून स्व. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना घोषित केले होते. तर भाजपने महेश गावित यांना उमेदवारी दिली होती. सध्या मतमोजणी सुरु असून, डेलकर यांनी 5506 मतांची आघाडी घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...