आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Shivsena MLA Bhaskar Jadhav Anvay Naik Case 'Devendra Fadnavis Suppressed The Naik Case In 2017 When He Was The Chief Minister' Bhaskar Jadhav

अन्वय नाईक प्रकरण:'2017 साली मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले'- भास्कर जाधव

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सचिन वाझे पदावर राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकांना बेड्या पडतील'

मनसुख हिरेन प्रकरणावरुन विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकारी सचिन वझे यांच्यावर हत्येचा आरोप केला. दरम्यान, यावेळी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर 2017 साली अन्वय नाईक प्रकरण दाबल्याचा आरोप केला.

विधानसभेत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, 2017 साली देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले. आता ठाकरे सरकार नाईक यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन याप्रकरणाची चौकशी करत आहे. त्यावेळेस सचिन वझे प्रकरणाचा तपास करत होते. ते पदावर कायम राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला.

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वझेंना अटक का झाली नाही?

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब सभागृहात वाचला. "माझ्या पतीची चौकशी वझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. एवढेच नव्हे तर हिरने यांची गाडीही चार महिने वझेंकडेची होती" असे हिरेन यांच्या पत्नी म्हणाल्या. "वझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वझे यांना कोण वाचवत आहे?" असा सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...