आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार अरविंद सावंत यांचा टोला:आधी उत्तर ठरले, मग RTI अर्ज केला; वेदांत प्रकल्प राज्याबाहेर गेला होता, तर शिंदेंनी बैठका का घेतल्या?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेदांता प्रकल्पाबाबत विचारलेल्या RTIला महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळाने त्याच दिवशी उत्तर दिल्याने आता या उत्तरावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आधी उत्तर ठरले होते, त्यानंतर आरटीआय करण्यात आला, असा टोला शिंदे-फडणवीस सरकारला लगावला होता.

अंधेरी पोटनिवडणुकीसारखाच प्रकार

माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले, वेंदाता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत काय उत्तर द्यायचे, याचा ड्राफ्ट आधीच सरकारने तयार केला होता. त्यानंतर आरटीआयअंतर्गत यावर प्रश्न विचारुन दिशाभूल करण्यात आली. हे म्हणजे अंधेरी पोटनिवडणुकीत सरळ माघार न घेता आधी कोणाला तरी माघार घ्या म्हणून विनंती करायला लावायची आणि मग माघार घ्यायची, असेच आहे. त्याचाच दुसरा टप्पा म्हणजे हे आरटीआय आहे.

शिंदे-फडणवीसांनी बैठका का घेतल्या?

अरविंद सावंत म्हणाले, औद्योगिक विकास महामंडळाने आरटीआयला दिलेल्या उत्तरात वेदांता प्रकल्पासाठी मविआ सरकारने काहीच केले नसल्याचे म्हटले आहे. मुळात आरटीआयने जे उत्तर दिले आहे तेच गमतीशीर आहे. कारण मविआने काहीच केले नव्हते व मविआ काळातच हा प्रकल्प राज्याबाहेर गेला होता, असे महामंडळाचे म्हणणे असेल तर मिंधे सरकारने या उद्योगांसाठी हाय पॉवर कमिटी बैठका का घेतल्या? वेंदाता प्रकल्प राज्याबाहेर गेला होता, तर बैठका कशासाठी घेतल्या हे शिंदे व फडणवीसांनीच स्पष्ट करावे.

कंपनीने स्वारस्य दाखवले होते

अरविंद सावंत म्हणाले की, आरटीआयच्या उत्तरानुसार 5 जानेवारी 2022 रोजी वेदांता फॉक्सकॉन कंपनीने स्वारस्य अभिरुचीचे पत्र महाराष्ट्र सरकारला दिले होते. तेव्हा महाराष्ट्रात मविआ सरकार होते. मग मविआ सरकारच्या काळात काहीच झाले नाही, असा आरोप कसा काय करता येऊ शकतो. फडणवीस म्हणतात की, मविआ काळातच प्रकल्प राज्याबाहेर गेला. मात्र, औद्योगिक विकास महामंडळाच्या उत्तरानुसार, या प्रकल्पासाठी 26 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. प्रकल्प राज्याबाहेर होता तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्या वेदांता-फॉक्सकॉनसाठी बैठक घेतली?

आदित्य ठाकरेंना उत्तर द्यावे

अरविंद सावंत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व दाव्यांची चिरफाड केली आहे. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंना समोरासमोर येऊन उत्तर द्यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत तर बोलायलाच नको. त्यांना काहीही विचारले तरी माहिती घेऊन सांगतो, असेच ते म्हणतात. त्यामुळे अशा या मिंधे सरकारला घरी पाठवण्याची वाट महाराष्ट्र पाहत आहे. पुढील निवडणुकात याचे चित्र स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...