आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव मनपा निकाल:लाज वाटायला पाहिजे, मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता; एकीकरण समितीच्या पराभवानंतर राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 58 जागेंसाठी होती निवडणूक

बेळगाव महानगर पालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. बेळगाव महानगर पालिकेची ही निवडणूक 58 जागांसाठी असून यात एकीकरण समितीला केवळ 3 जागा मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपने मिळवलेल्या यशानंतर राज्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांकडून फटाके आणि पेढे वाटप देखील केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'लाज वाटायला पाहिजे, मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता असा संतप्त सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
बेळगाव मनपा निवडणुकीच्या निकालावरुन राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, तुमचा पक्ष जिंकलाय पण मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला आहे. यासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली 69 मराठी माणसांनी हौतात्म्य दिले आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांच्या अस्मितेसाठी तुरंगात गेले आहे. परंतु, तुम्ही राज्यात पेढे वाटता लाट वाटायला पाहिजे. यासाठी मराठी माणूस कदापीही माफ करणार नाही असे संजय राऊत म्हणाले.

58 जागेंसाठी होती निवडणूक
बेळगाव महानगर पालिकांची ही निवडणूक 58 जागांसाठी होती. दरम्यान, यामध्ये तब्बल 358 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. विशेष म्हणजे यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसह सर्वपक्षीय उमेदवारांनी आपापल्या पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवली. अनेक दिग्गज नेते हे प्रकाराच्या रिंगणात उतरले होते.

बेळगावमधील पराभवामागे मोठे कारस्थान - संजय राऊतांना संशय
संजय राऊत बोलताना म्हणाले की, या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने भाजपला जोरदार धडक दिली. दरम्यान, या निवडणुकीत एकीकरण समितीला मोठे यश मिळेल असे वाटत होते. परंतु, एकीकरण समितीला केवळ 3 जागा मिळाल्याने या पराभवामागे मोठे कारस्थान असल्याची शंका राऊतांनी यावेळी उपस्थित केली. बेळगाववर महाराष्ट्राचा हक्क राहू नये यासाठी कर्नाटक सरकारने मोठी गडबड केली आहे. यासंदर्भांतील माहिती लवकरच समोर येईल असेही राऊत यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...