आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजप संबंध:आमचे संबंध भारत पाकिस्तानासारखे नसून आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटासारखे - खासदार संजय राऊत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेना-भाजप संबंधाच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. फडणवीस यांच्या विधानावर टीका करत दोन्ही पक्षांच्या संबंधाचे वर्णन आमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाशी केले. ते म्हणाले की, भाजप सेनेचे संबंध हे काही भारत पाकिस्तानासारखे नाही, तर अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटासारखे आहे.

राजकारणात वैचारिक मतभेद होतात, पण आमची मैत्री कायम आहे. परंतु, मैत्री कायम आहे याचा अर्थ असा होत नाही की, आम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन करणार आहोत. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
शिवसेना-भाजपमध्ये कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. शिवसेनेशी आमचे शत्रुत्व नाही, आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केल्यामुळे राजकीय वतुर्ळात पुन्हा चर्चांना उधाण आले होते. त्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती.

ते पुढे म्हणाले की, ज्यांच्याविरोधात निवडून आले त्यांचाच हात धरून आमचे मित्र निघून गेले. त्यामुळे मतभेद झाले. अर्थात, राजकारणात जर-तरला अर्थ नसतो. परिस्थितीनुसार निर्णय होत असतो असेही ते म्हणाले होते.

एमपीएससी आयोगाची पुनर्रचना आवश्यक
एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची आत्महत्या गंभीर घटना आहे. एमपीएससीवर सदस्य नाहीत, परीक्षा वेळेत होत नाहीत, असा आरोप करत आयोगाची पुनर्रचना केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आमच्या काळात प्रसिद्धीवर 26 कोटी खर्च होत होते. या सरकारने 7 महिन्यांत 166 कोटी खर्च केल्याबद्दल फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

बातम्या आणखी आहेत...