आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राउत vs फडणवीस:फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, मी त्यांची भेट घेईन; संजय राउत यांची माजी मुख्यमंत्र्यांवर उपरोधक टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फडणवीस यांना अशी संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही

राज्यात भाजपची सत्ता आल्यास तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण नाही दिले तर मी राजकीय संन्यास घेईन अशी गर्जना महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली होती. ते ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी भाजपने पुकारलेल्या जेलभरो आंदोलनात बोलत होते. फडणवीसांच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात टीका टिप्पणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर उपरोधात्मक टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल असून ते लढवय्ये नेते आहेत त्यामुळे अशा नेत्यांची देशाला नितांत गरज आहे. फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेतल्यास भाजपसह जनतेचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे फडणवीस यांना अशी संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही. ते जर संन्यास घेत असतील मी त्यांना भेटून मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...