आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना भवन वाद:भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले - आमचे शाखाप्रमुख बोलतील

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाले होते प्रसाद लाड?

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच संताप उफाळून आला होता. त्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून सर्वच स्तरांतून त्यांचा निषेध करत आहे. परंतु, यावर शिवसेना खासदार संजय राऊत काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, राऊत यांनी प्रसाद लाड यांना काही महत्व न देता याला 'आमचे शाखाप्रमुख बोलतील' असे म्हटले आहे.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?
शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी 'वेळ पडल्यास शिवसेना भवन देखील फोडू' असे वक्तव केले होते. दरम्यान, ते म्हणाले होते की, आम्ही माहीममध्ये आलो की त्यांना वाटत सेना भवनच फोडणार की काय? पण काही घाबरु नका वेळ आली तर ते देखील करु असे ते म्हणाले होते. यावेळी भाजप नेते नितेश राणेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

त्यानंतर केली सारवासारव!
आमदार प्रसाद लाड यांनी रात्री उशीरा या विधानावर आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन स्पष्टीकरण दिले आहेत. त्यांनी लिहिले की, शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो आणि त्याच शिवसेनाप्रमुखांच्या सेना भवनाबद्दल आम्ही कधी वाईट बोलण शक्य नाही! प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला..! असे म्हणतं सारवासारव केली आहे.

बातम्या आणखी आहेत...