आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:कालपासून ईडीचे कोणी आले नाही, कदाचित भाजप कार्यालयात नोटीस अडकली असेल; संजय राऊत यांचा भाजपला टोला

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोटीसीबद्दल मला माहिती नाही, मी माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय : संजय राऊत

कालपासून ईडीचे कोणीच आले नाही, आता मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिकडे कुठे नोटीस अडकली असेल. असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. राऊत त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याप्रकरणी बोलत होते. त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान मला याबाबत काही माहीत नाही. मला ईडीचे नोटीस आली हे भाजपचे लोक सांगत आहेत. हे सर्व राजकारण ज्यांना करायचे आहे त्यांना करुद्या, असेही ते म्हणाले. ईडीची नोटीस याबद्दल शिवसेना भवनात दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात प्रवीणच्या खात्यातून मोठी रक्कम आली होती. संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वर्षा यांच्या खात्यात कर्जासाठी काही रक्कम घेतल्याचे नमूद केेले आहे. हा व्यवहार ईडीला जाणून घ्यायचा आहे.

महाविकास आघाडीकडून टीका

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस धाडली आहे. नोटीसनुसार २९ डिसेंबरला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...