आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेची भूमिका:'आपला जवळचा माणूस असला तरीही मुख्यमंत्री कठोर कारवाई करतील', पोहरादेवी येथील नियमांच्या उल्लंघनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी जमलेल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत.

राज्यात कोरोनाचे संकट डोके वर काढत असताना वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे प्रचंड गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. यावर राज्य सरकार कारवाई करणार का? असा प्रश्न होता. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाष्य केले आहे. मंगळवारी जमलेल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती राऊतांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी गर्दी गंभीर आहे. संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत. पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध मोडून प्रचंड गर्दी झाली. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. आता संजय राठोड यांच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.'

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करत असतात. नियम मोडल्यानंतर ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी याबाबत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.'

बातम्या आणखी आहेत...