आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले. आता या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत त्यांच्याच शैलीत समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याची पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. भारताने पाकिस्तान आणि चीनवर सर्जिकल स्ट्राइक करायला हवा असे राऊत म्हणाले आहेत.
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याविषयी राऊत म्हणाले की, 'जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक करायला हवा. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, हात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असेल तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेतेयय. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार करायला हवा आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे' असा खोचक शब्दात राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा आज 15 वा दिवस आहे. पंजाब, हरयाणातील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हे आंदोलन तीव्र होत आहे. मात्र दुसरीकडे भाजपचे नेते या आंदोलनावर टीका करत आहेत. रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडला आहे. दानवे म्हणाले होते की, 'हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही तर या मागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवले आणि सीएए आणि एनसीआरमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावे लागेल, असे सांगितले. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?' असा सवाल रावसाहेब दानवेंनी विचारला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.