आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद नामांतर:'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच' - संजय राऊत

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे.

सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना पक्ष हे आमनेसामने आल्याचे पाहालाय मिळतेय. काँग्रेसकडून संभाजीनगर या नावाला सातत्याने विरोध होत दिसत आहे. दरम्यान भाजपकडून सातत्याने नामांतराची मागणी केली जात आहे. आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केले आहे. 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच' असे ते म्हणाले आहेत.

आज शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक या सदरातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दरम्यान औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच आहे आणि संभाजीनगरच राहणार आहे. हा लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण चर्चा करू शकतो, पण निर्णय घेण्यात आला आहे' असेही राऊत म्हणाले.

दरम्यान औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस या विषयावरुन एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. 'औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!' असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेवरच निशाणा साधला आहे.

बातम्या आणखी आहेत...