आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजेट 2021 वर प्रतिक्रिया:मोदी सरकारने आता आर्थिक थापा बंद करायला हव्यात; अर्थसंकल्पावरून संजय राऊत यांचा टोला

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, असे हे दिल्लीतील बाजीराव' : संजय राऊत

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय. बजेटचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून आहे पण आम्हाला निराशा करणारा आहे. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत. आपल्याकडे तेवढा पैसा आहे का हे आधी पाहावे. त्यामुळे मोदी सरकारने आता आर्थिक थापा मारणे बंद करावे.' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुंबई पत्रकारांशी बोलत होते.

देशाचे बजेट आहे की पक्षाचे

राऊत म्हणाले की, 'या अर्थसंकल्पाने नाराजी केली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही. जे आकडे येत असतात, ते किती खरे हे 6 महिन्यांनी समजते. पण मोदी सरकारने आता आर्थिक थापा बंद करायला हव्यात, असा टोला राऊत यांनी लगावला. काही राज्यांच्या निवडणुका लक्षात घेवून निधी वाटप केले आहे का? 'शेतकऱ्यांचे ऐका जरा. देशाचे बजेट आहे की पक्षाचे बजेट आहे', असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

'मुंबईची मेट्रो का अडकून ठेवली?

'नाशिक व नागपुरात भाजपची सत्ता असल्यामुळे मेट्रोसाठी निधी दिला. 'मुंबईची मेट्रो का अडकून ठेवली आहे ? जमीन केंद्राची आहे म्हणतात. मग मेट्रोलासाठी जमीन मंगळावरून आणली का? असा सवालही राऊत यांनी यावेळी विचारला.