आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई महापालिकेवर भाजपचा शुद्ध भगवा फडकवण्याचा नारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यांना आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या 100 पिढ्या आल्या तरी मुंबईवरचा भगवा उतरणार नाही असे राऊत म्हणाले. तसेच मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी भाष्य केले.
'भाजपला मुंबईतील आर्थिक उलाढालींमध्ये, शेअर बाजारामध्ये, जमिनींमध्ये रस आहे. त्यांना मुंबईला दिल्लीचे पायपुसणे बनवायचे आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. कोणाच्या 100 पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महापालिकेवरून शिवरायांचा भगवा कोणी खाली उतरवू शकत नाही असे राऊतांनी ठणकावले आहे.
भाजपला मुंबईच्या आर्थिक उलाढाली, जमिनींमध्ये रस
संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राऊत म्हणाले की, भाजप एक राष्ट्रीय किंबहुना आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना मुंबईमध्ये, मुंबईच्या उद्योगांमध्ये, आर्थिक उलाढाली, जमिनींमध्ये रस आहे याच कारणामुळे त्यांना मुंबई महापालिकेत रस आहे. हे गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू आहे. त्यांना मुंबईला दिल्लीचे गुलाम, पायपुसणे करायचे आहे. मात्र आम्ही असे होऊ देत नाही. त्यांना मुंबई विकायची आहे, घशात घालायची आहे. मुंबई ओरबाडण्याला आमचा विरोध आहे. कोणाच्या 100 पिढ्या जरी आल्या तरी मुंबई महानगरपालिकेवर आज जो भगवा फडतोय त्याला हात लावण्याची, तो खाली उतरवण्याचीही हिंमत करणाऱ्यांचे हात जळून खाक होतील अशे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.
मुंबईमध्ये बुधवारी भाजपच्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार असल्याचे बोलून दाखवले होते. 'डोक्यात सत्ता गेली की पतन अटळ असते आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी सत्ता बदलण्याची वेळ आता आली आहे,' असे वक्तव्य त्यांनी केले होती. यावरुन संजय राऊतांनी फडणवीसांचा समाचार घेतला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.